"हिंगोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
आशय जोडला
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८:
 
हिंगोली तालुक्यात [[सिरसम बुद्रुक]] नावाच्या गावी मोठी बाजारपेठ आहे
 
== इतिहास ==
मराठवाडा विभाग हा आगोदर निझामाच्या राजवटीचा भाग होता. हिंगोली हा परभणी जिल्ह्यातील एक तालुका होता. इंग्रजशासित वऱ्हाड विभागाच्या सीमेवर असल्याने हिंगोली शहर हे निजामाचे लष्करी तळ होते. त्याकाळी लष्करी दळ, दवाखाने, प्राण्यांचे दवाखाने हिंगोलीवरून चालत. हिंगोलीचे नागरिक दोन मोठ्या लढायांना सामोरे गेले आहेत - १८०३ मधलं मराठे आणि टिपू सुलतान यांमध्ये झालेलं युद्ध आणि १८५७ सालचं नागपूरकर आणि भोसल्यांचं युद्ध. लष्करी तळ असल्यामुळे हिंगोली हे निझामाच्या राज्यातलं महत्त्वाचं तसंच प्रसिद्ध शहर होतं.
 
पलटण, रिसाला, सदर बाजार, तोफखाना, पेन्शनपुरासारखी ठिकाणे आजही प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यानंतर १९५६ मध्ये मराठवाडा मुंबई प्रांतात सामील झाला आणि १९६० मध्ये हिंगोली हे परभणी जिल्ह्याचा भाग म्हणून महाराष्ट्र राज्यात आलं. १ मे १९९९ रोजी हिंगोली येथे मुख्यालय असलेला नवीन हिंगोली जिल्हा अस्तित्वात आला.
 
== धार्मिक स्थळे ==
हिंगोली शहरातील खालील मंदीरे प्रसिद्ध आहेत.<ref>http://hingoli.nic.in/Ntouristplace.html</ref><ref>https://www.maharashtratourism.gov.in/docs/default-source/district-draft-toursim-plans/hingoli-district.pdf?sfvrsn=2</ref>
*जलेश्वर मंदीर (तळ्यातला महादेव)
*श्री दत्त मंदीर, मंगळवारा
*श्री खाकी बाबा मठ
*दक्षिणमुखी हनुमान मंदिर, खटकाळी
*पोळा मारोती मंदीर, वंजारवाडा
*चिंतामणी गणपती मंदीर
 
== भौगोलिक माहिती ==
हिंगोली शहर अक्षांश १९.७२ आणि रेखांश ७७.१५ वर वसलेले आहे. समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ही ४५७ मि इतकी आहे. शहरात दोन तळी आणि एक नदी आहे. नदीचं नाव कयाधू नदी आहे.
 
== लोकजीवन ==
२०११ च्या जनगणनेनुसार<ref>{{cite web|url=https://www.census2011.co.in/towns.php}}</ref> हिंगोली शहराची लोकसंख्या ही ८५,१०३ इतकी आहे. हिंगोली शहरात ६७% लोकं साक्षर असून ७४% पुरुष आणि ६०% महीला साक्षर आहेत. ६ वर्षाखालील मुलांची टक्केवारी १५% आहे.
हिंगोली शहरात ५३.४१ टक्के हिंदू, ३३.४७ टक्के मुस्लिम, ०.२४ टक्के ख्रिशचन, १०.६३ टक्के बौद्ध, २.०३ टक्के जैन, ०.०२ टक्के इतर धर्म आणि ०.०७ टक्के माहीती सांगितली नाही.
मराठी ही शहरातली प्रमुख भाषा आहे. सर्व शासकीय व दैनंदीन व्यवहार मराठीतूनच होतात. शहरात दक्खनी उर्दू, मारवाडी, गुजराती, तेलुगू भाषाही बोलल्या जातात. मराठी ही संपर्कभाषा आहे.
 
==हे सुद्धा पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/हिंगोली" पासून हुडकले