३,१२८
संपादने
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) |
Pooja Jadhav (चर्चा | योगदान) |
||
[[चित्र:Bucket of raw okra pods.jpg|thumb|right|300px|भेंडी]]
'''[[:en:Okra|भेंडी]]''' ही एक [[फळ]]<nowiki/>भाजी आहे. ही भाजी जवळ जवळ वर्षभर [[बाजार तरलता|बाजारात]] उपलब्ध असते.
भेंडी हे एक उत्तम फळभाजी पिक आहे भेंडीच्या फळात कॅलशियल व आयोडिन ही मुलद्रव्य आणि क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.
भेंडीच्या भाजीला वर्षभर भरपूर मागणी असते. महाराष्ट्रात भेंडी पिकाच्या लागवडीखाली ५,३०० हेक्टर क्षेत्र आहे. महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांत भेंडीची लागवड कमीअधिक प्रमाणात केली जाते. पुणे, जळगाव, धुके, अहमदनगर, नाशिक आणि सातारा जिल्ह्यात भेंडीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. भेंडीच्या १०० ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे - पाणी-९०%,प्रोटीन्स -१.९ %, तंतुमय पदार्थ - १.२%, मॅग्नेशियम - ०.४ %, फॉस्फरस - ०.०६%, पोटॅशियम - ०.१%, कार्बोहायड्रेट्स - ६.४%, फॅट्स - ०.२%, खनिजे - ०.७ %, कॅल्शियम - ०.०७%, लोह -०.००२%, सल्फर -०.०३%, जीवनसत्त्व 'अ' - ८८ इंटरनॅशनल युनिट, जीवनसत्त्व 'क' - ०.००१, उष्मांक (कॅलरीज) -२२ % आहेत.
==भेंडी लागवड==
भेंडी हे भाजीपाला पीक मूळचे दक्षिण आफ्रिकेतील किंवा आशिया खंडातील मानले जाते. भेंडीची लागवड वर्षभर केली जाऊ शकते. अधिक उत्पादनासाठी खरीप व उन्हाळी हंगामात भेंडीची लागवड करणे फायद्याचे ठरते. भेंडीमध्ये विविध जीवनसत्वे, लोह तसेच खनिजे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. भेंडीच्या झाडाचा वापर कागद तयार करण्यासाठी केला जातो. या अशा विविध कारणांमुळे मागणी असलेल्या भेंडीची लागवड करणे शेतकरी बांधवांसाठी फायद्याचे ठरू शकते.
|
संपादने