"भेंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

८५० बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
जमीन तयार करताना हेक्टरी २५ ते ३० टन शेणखत जमिनीत मिसळावे. तसेच हेक्टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश द्यावे. लागवडीच्या वेळी अर्धे नत्र लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.पावसाळ्यात आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. उन्हाळी हंगामांत ५ ते ६ दिवसांनी पाणी द्यावे. हिवाळ्यात ८ ते १० दिवसांनी पाणी द्यावे.
गरजेनुसार निंदणी करून तणांचा बंदोबस्त करावा. पिकाला मातीची भर द्यावी. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून चर काढून घ्यावेत. लागवडीपूर्वी ४ ते ५ दिवस अगोदर २ ते २.५ लिटर बासालीन साधारण ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारल्यास तणांचा बंदोबस्त होतो.
===काढणी===
बी लावल्यापासून ४० ते ४५ दिवसांत भेंडीला फुले येतात. फुले आल्यानंतर चौथ्या ते सहाव्या दिवसापर्यंत भेंडीची जास्तीत जास्त लांबी, जाडी आणि वजन वाढते. त्या वेळीच त्याची काढणी करावी. एक दिवसाआड भेंडीची तोडणी करावी. तोडणी सकाळी केल्यास भेंडीचा ताजेपणा, रंग अन तजेला जास्त काळ टिकून राहतो. तोडणीनंतर भेंडी सावलीत ठेवावी.
==फायदे==
 
३,१२८

संपादने