"सुंठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १४:
* सुंठ आणि वावडिंगाचे चूर्ण मधात कालवून खाल्ल्याने कृमी नष्ट होतात.
* आम्लपित्तात सुंठ, आवळकाठी आणि खडीसाखरेचे चूर्ण करून ते वरचेवर प्यावे.
 
'''<big><u>सूंठ : किती महत्त्वाची?</u></big>'''
 
आल्याला दुधामध्ये भिजवून उन्हामध्ये सुकवले की सुंठ तयार होते. सुंठीला ‘विश्वभेषज’ म्हणजे संपूर्ण जगाचे औषध असे म्हटले आहे. नुसत्या अनुपान भेदानेसुद्धा वात, पित्त व कफ या तिन्ही दोषांमुळे निर्माण होणाऱ्या विविध रोगांवर सुंठ उपयोगी पडते. सुंठीचे प्रमुख उपयोग होतो तो पचन संख्येच्या सर्व विकारांवर!
 
पाव चमचा सुंठ पावडर आणि छोटय़ा सुपारीएवढा गुळाचा खडा व ते एकत्र करायला लागेल एवढे घरचे तूप, अशी गोळी करून ती नाश्ता आणि दोन्ही जेवणापूर्वी चावून खाऊन वर कोमट पाणी प्यावे. भूक न लागणे, अ‍ॅसिडिटी, अपचन, मळमळ, पोट दुखणे, पोट जड होणे, गॅस, पोटात मुरडून संडासला होणे अशा सर्व तक्रारींवर अत्यंत उपयोगी आहे. सुंठ घेतल्यावर पित्त होते, हा गैरसमज आहे. सुंठ फक्त चवीला तिखट आहे. ती पचल्यावर तिचे कार्य हे मधुर (गोड) गुणाने होते आणि मधुर रस हा पित्तशामक आहे. आम्लपित्तात तर सुंठ हा हुकमी एक्का आहे.सुंठ, बडिशेप व खसखस समभाग पावडर करून तुपावर भाजून या सर्वाच्या एकत्र मिश्रणाएवढी साखर घालून अर्धा ते एक सपाट चमचा, दोन्ही जेवणाअगोदर कोमट पाण्याबरोबर घ्यावे. पोटात मुरडून, कळ येऊन, थोडे थोडे पांढरे बुळबुटीत शौचास होणे, थोडय़ाशा निमित्ताने वारंवार पोट बिघडणे, बऱ्याचदा शौचाला गेल्यावर संडासाऐवजी नुसती पांढरी आंव पडणे या सर्वावर या मिश्रणाचा खूप उपयोग होतो.वारंवार ताप येत असेल तर त्याला तांब्याभर पाण्यात एक चमचा सुंठ घालून ते चांगले उकळवून तेच पाणी पिण्यास द्यावे. गर्भवतीलाही ताप आल्यास कोमट दुधातून सुंठ द्यावी.सुंठीवाचून खोकला गेला असे म्हणतात!एक वाटी खडीसाखरेच्या पाकात एक चमचा भर सुंठ पावडर घालून एक कढ काढून थंड झाल्यावर तो ‘सुंठ पाक’ थोडा थोडा वारंवार चाखावा, वारंवार येणारा खोकला किंवा खोकल्याची ढास लगेच थांबते. सुंठ, ज्येष्ठमध व सीतोपला चूर्णही मधातून चाटवल्यास बरम्य़ाच दिवसांचे खोकले बरे होतात.
 
==सुंठपाक==
"https://mr.wikipedia.org/wiki/सुंठ" पासून हुडकले