"कडुलिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १८:
 
हे संपूर्ण भारतात आढळणारे, नैसर्गिकरीत्या उगवणारे, एक बहूपयोगी झाड आहे. याला लिंबाच्या रंगाची छोटी छोटी कडू चवीची फळे लागतात, म्हणून याचे नाव कडूलिंब. या झाडाची पाने, फळे, बिया, साल, मुळे सर्व कडू असतात. याच्या अनेक उपयोगामुळे हे सर्वांचे आवडते झाड आहे. कडू असल्यामुळे 'जंतुघ्न'हा याचा गुणधर्म पशु-पक्षी, पीक, मानव या सर्वांसाठी वापरला जातो. गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी याची कोवळी पाने, फुले, लहान कोवळी फळे, जिरे, मिरे,सैन्धव मीठ, ओवा, गूळ, हिंग, चिंच हे सर्व एकत्र वाटून त्याची गोळी करून खातात.कडुलिंबचे झाड मोठे असते. हे झाड सर्वसाधारणपणे आठ ते दहा मीटर उंच वाढते. याचे खोड सरळ वाढते; नंतर याला फांद्या फुटतात.या झाडाची साल काळी व खडबडीत असते.याची पाने हिरवी,मध्यम आकाराची अ लांबट असतात. पानाच्या कडेने नक्षी असते. एका काडीला दहा ते बारा पाने येतात. पानाचा देठ बारीक असतो. चव कडवट असते. या झाडाची फुले लहान,पांढरया रंगाची तसेच सुगंधी असतात.या झाडाची फळे कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर पिवळ्या रंगाची दिसतात. त्या फळाचा आकार लहान असतो. त्यात बी असते.त्याला लीबोळी असे म्हणतात.
==गुणधर्म==
अंगात मुरलेली उष्णता किंवा कडकी कमी करणे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हा महत्वाच गुणधर्म कडूनिंबात आहे. उन्ह्याल्यामुळे गोवर, कांजिण्या, देवी( पूर्वी) ह्या सारखे रोग उद्भवतात, अश्यावेळी रोग्याला कडूनिंबाच्या पानांच्या अंथरुणावर झोपवून मंत्र म्हणत असत. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी होते.
==धार्मिक महत्व==
"https://mr.wikipedia.org/wiki/कडुलिंब" पासून हुडकले