"मायकेल मधुसूदन दत्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २९:
 
==जन्म ,बालपण आणि शिक्षण==
२५ जानेवारी १८२४मध्ये पूर्व बंगालच्या जेसोर जिल्ह्यातील सागरदरी हा गावात मायकेल मधुसूदन दत्त यांचा जन्म झाला. सदर न्यायालयात वकिलाचे काम करणाऱ्या श्री राजनारायण दत्त आणि श्रीमती जान्हवी देवी यांच्या पोटी त्यांनी जन्म घेतला. शेकपुरा नामक एका छोट्या गावातील मशिदीमध्ये मायकेल यांचे प्राथमिक शिक्षण झाले. येथे त्यांनी फारसी भाषा शिकण्यास सुरुवात केली. लहानपणापासून मायकेल यांना त्यांचे शिक्षक आणि सवंगडी एक हुशार आणि प्रतिभावान विद्यार्थी म्हणून ओळखू लागले.
 
कोलकाता मध्ये शिक्षण घेत असताना मायकेलची ओळख इंग्रजी साहित्य आणि जीवनशैलीशी झाली. कोलकाताच्या हिंदू महाविद्यालयातील एक इंग्रज शिक्षक डेव्हिड लेस्टर रिचर्डसन यांचा माय्केल्वर चांगलाच प्रभाव पडला. याच रिचर्डसन यांनी मायकेलला इंग्रजी काव्याची विशेषतः लॉर्ड बायरन या कवीच्या काव्याची गोडी लावली.
 
साधारण १७ वर्षांच्या वयात मायकेल कविता लिहू लागले. याच काळात त्यांच्यावर '''यंग इंडिया''' या चळवळीचा प्रभाव पडू लागला. हिंदू महाविद्यालययाच्या (हे सध्या प्रेसिडेन्सी महाविद्यालय म्हणून ओळखले जाते) काही माजी विद्यार्थ्यांनी अन्याय अत्याचार , अंधश्रद्धा आणि कालबाह्य रुढींच्या विरोधात ही चळवळ उभारली होती. मायकेलवर या चळवळीचा प्रभाव पडू लागल्याचे पाहताच त्याच्या वडिलांनी मायकेलचे लग्न लावून देण्याचा घाट घातला. मायकेलने या विरुद्ध बंड केले. याच काळात मायकेलचा ख्रिस्ती धर्माच्या दिशेने कल झुकू लागला होता.
 
==साहित्यिक योगदान==