"बुद्ध पौर्णिमा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संदर्भ घातला
ओळ ११:
 
==बुद्ध जयंतीचे महत्व ==
जगातील दुःख नाहीसे करण्यासाठी भगवान गौतम बुद्धांनी निरनिराळे मार्ग अनुसरले. यासाठी स्वतःचे घरदार सोडून ध्यान मार्ग आणि तपश्चर्येचा मार्गही अनुभवला. मात्र, वैशाख शुद्ध पौर्णिमेला त्यांना ज्ञान प्राप्‍त झाले आणि दुःखाचे मूळ व ते नाहीसे करण्याचा मार्ग सापडला. ही [[पौर्णिमा]] बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=fQB3Fkc3Tl4C&pg=PA18&dq=buddha+purnima&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjqq5bAm9faAhVMQo8KHfRGCYUQ6AEIQTAF#v=onepage&q=buddha%20purnima&f=false|title=Encyclopaedia of India|last=Bansal|first=Sunita Pant|date=2005-06|publisher=Smriti Books|isbn=9788187967712|language=en}}</ref>
 
आरंभीचा प्रथमावस्थेतील बौद्ध धर्म हा अगदी साधा, समजण्यास सोपा, नैतिक तत्त्वांवर भिस्त ठेवणारा व मानवता, करुणा व समानता यांचा पुरस्कार करणारा असा होता. या काळात बुद्ध हा असामान्य गुणवत्ता असलेला, पण मानवदेह धारण करणाराच मानला जात होता. त्यांना बोधिवृक्षाखाली संबोधीज्ञान प्राप्‍त झाले म्हणजे त्यांना या जगात कोणती अबाधित सत्ये आहेत व जगाचे रहाटगाडगे कसे चालते, या सबंधीचे ज्ञान प्राप्‍त झाले. त्यांना प्रथम चार आर्य सत्यांचा साक्षात्कार झाला. जगात खोल दृष्टीने विचार करता व सर्वत्र चालू असलेले भांडण-तंटे, झगडे, हाणामारी हे दृश्य पाहून सर्वत्र दुःख पसरलेले आहे. या पहिल्या आर्य सत्याची जाणीव झाली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=OPpf1up4ZwgC&printsec=frontcover&dq=Aarysatya&hl=en&sa=X&ved=0ahUKEwjF-8vumdfaAhWGqo8KHRACA4AQ6AEIZDAJ#v=onepage&q&f=false|title=The Four Noble Truths: The Foundation of Buddhist Thought|last=Tsering|first=Geshe Tashi|date=2010-07|publisher=ReadHowYouWant.com|isbn=9781458783950|language=en}}</ref>दुःख कशामुळे उत्पन्न होते, यासबंधी विचार करता त्यांना आढळून आले की, हे सर्व लोभामुळे, तृष्णेमुळे उत्पन्न होते. एकाच वस्तूबद्दल दोन व्यक्तींच्या मनात तृष्णा उत्पन्न झाली म्हणजे ती वस्तु स्वतःला मिळविण्याकरीता भांडण-तंटे, झगडा, हाणामारी आलीच. तेव्हा तृष्णा हे दुःखाचे मूळ आहे, असे दुसरे आर्य सत्य त्यांना उमजले.ज्या ज्या गोष्टीला एखादे कारण आहे ती ती गोष्ट, कारण नाहीसे केले म्हणजे, नष्ट होते. हे अबाधित तत्त्व आहे. म्हणून त्या दुःखाचा निरोधही होऊ शकतो, हे तिसरे आर्य सत्य त्यांना समजले. निरोध होऊ शकतो तर तो प्राप्‍त करून घेण्याचा मार्ग असलाच पाहिजे, हे चौथे आर्य सत्यही त्यांना कळून आले.<ref name="अभिव्यक्ति" />