"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''मी टू''' ही चळवळ कार्यालयीन वातावरणात अथवा कामाच्या ठिकाणी होणाऱ...
 
ओळ ४:
==मी टू मोहिमेची सुरुवात==
 
५ ऑक्टोबर २०१७ रोजी न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्रात अॅशले जड (Ashley Judd) या अभिनेत्रीची मुलाखत प्रसिद्ध झाले. अॅशलेने प्रसिद्ध चित्रपट निर्माता हार्वे वेनस्टेईन यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले.<ref>https://www.nytimes.com/2017/10/05/us/harvey-weinstein-harassment-allegations.html</ref> . हार्वे वेनस्टेईन यांनी पल्प फिक्शन, गुड विल हंटिंग, शेक्सपियर इन लव्ह अशा सुमारे सहा ऑस्कर पारितोषिक प्राप्त चित्रपटांची निर्मिती केली आहे.<ref>https://www.imdb.com/name/nm0005544/?ref_=nv_sr_3</ref>. न्यूयॉर्क टाइम्सने केलेल्या अधिक चौकशीत अनेक अभिनेत्री तसेच हार्वे याच्या मीरामॅक्स कंपनीतील कर्मचारी स्त्रियांनी अशा अनेक घटना कथित केल्या. वृत्तपत्रात आलेल्या या बातम्यांमुळे हार्वे याची त्याच्या द वेनस्टेइन कंपनी मधून संचालक मंडळाने हकालपट्टी केली.
१६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्विटर या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली.<ref>http://www.chicagotribune.com/lifestyles/ct-me-too-campaign-origins-20171019-story.html</ref>
 
१२ ऑक्टोबर २०१७ रोजी इसा हॅकेट या दूरदर्शन निर्मातीने अॅमेझॉन स्टुडिओचे प्रमुख रॉय प्राईस यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. प्राईस यांनी केलेल्या छळाबद्दल केलेली तक्रार अॅमेझॉन स्टुडिओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुर्लक्षित केली असाही आरोप इसा यांनी केला. या मुलाखतीमुळे रॉय प्राईस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. <ref>https://www.hollywoodreporter.com/news/amazon-tv-producer-goes-public-harassment-claim-top-exec-roy-price-1048060</ref>
 
१६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्विटर या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर मी टू हा हॅशटॅग वापरा असे तिने आवाहन केल्यावर, एका दिवसात सुमारे ४०००० लोकांनी, ज्यात बहुतांश स्त्रिया होत्या, #MeToo हा हॅशटॅग वापरला. <ref>http://www.chicagotribune.com/lifestyles/ct-me-too-campaign-origins-20171019-story.html</ref>
या नंतर अनेक अभिनेत्री आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला.