"मी टू मोहीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''मी टू''' ही चळवळ कार्यालयीन वातावरणात अथवा कामाच्या ठिकाणी होणाऱ...
(काही फरक नाही)

१०:०८, २३ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

मी टू ही चळवळ कार्यालयीन वातावरणात अथवा कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी सुरु झालेली मोहीम आहे.


मी टू मोहिमेची सुरुवात

१६ ऑक्टोबर २०१७ रोजी अलिसा मिलानो या अभिनेत्रीने ट्विटर या संकेतस्थळावर #MeToo हा हॅशटॅग वापरून तिने हॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये होणाऱ्या लैंगिक शोषणाविरुद्ध वाचा फोडली.[१] या नंतर अनेक अभिनेत्री आणि सामान्य स्त्रियांनी #मीटू वापरून आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या कहाण्या सांगितल्या तसेच न्याय मागितला.

मी टू ची निर्माती

ट्विटर संकेत स्थळावर जरी आलीस मिलानो हिने #मी टू चा वापर प्रचलित केला असला तरी हे शब्द लैंगिक शोषणासंदर्भात वापरण्याचे श्रेय तराना बर्क या स्त्री हक्क कार्यकर्तीला जाते. १९९७ साली एका तेरा वर्षाच्या लैंगिक शोषणाची शिकार बनलेल्या मुलीशी बोलत होत्या. "तिला कसा प्रतिसाद द्यावा हेच मला सुचत नव्हते. 'मी सुद्धा ' अशा अत्याचाराची शिकार आहे हे सुद्धा मी तिला सांगू शकले नाही. अनेक वर्ष हा प्रसंग माझ्या मनात घर करून राहिला."

या संभाषणानंतर १० वर्षांनी तराना बर्क यांनी 'जस्ट बी' या ना-नफा संस्थेची स्थापना केली. लैंगिक अत्याचाराची आणि हिंसेची शिकार बनलेल्या स्त्रियांच्या मदतीसाठी हि संस्था काम करते. तराना यांनी या चळवळीला नाव दिले "मी टू".[२]




  1. ^ http://www.chicagotribune.com/lifestyles/ct-me-too-campaign-origins-20171019-story.html
  2. ^ https://www.nytimes.com/2017/10/20/us/me-too-movement-tarana-burke.html