"कासार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २४:
कां हीं प्र सि द्ध पु रु ष.- कै. नारायण भाई दांडेकर ( शिक्षणखात्याचे पहिले नेटिव्ह डायरेक्टर, हे वर्‍हाडांत होते ). कै. बाळकृष्ण गोपाळ तालीम ( कॉन्ट्रॅक्टर हैदराबाद संस्थान ). कै. रामकृष्ण माणिकजी येडकर ( व्यापारी ). कै. रामकृष्ण पुरुषोत्तम वाकनीस ( इनामदार ). रा. रा. आनंदराव वामन शेटे ( ऑनररी मॅजिस्ट्रेट ). भास्कर रामचंद्र आर्ते एम. ए. ( प्रोफेसर बरोडा कॉलेज ).
 
सं स्था.- त्वष्टाकांसार विद्योत्तेजक मंडळी को आपरेटिव्ह सोसायटी; त्वष्टाकांसार ज्ञाती संस्थान मुंबई; कासार समाजोन्नति मंडळ मलकापूर ([[वऱ्हाड|वर्‍हाड]]). ज्ञातीचे त्वष्टासेवक नामक मासिक ( संपादक, रामकृष्ण महादेव समेळ ).
 
या ज्ञातींतील बरेच सुशिक्षित लोक निरनिराळ्या धंद्यांत व मोठ्या दर्जांवरहि आहेत.
 
क्षत्रिय कां सा र.- ही जात बरीच मोठी आहे. या जातींतील क्षत्रिय कां सा र, जैन मंडळी; कांसार जात सर्वच क्षत्रिय कां सा र, जैनधर्मी आहे सर्व कासारांनीं जैन बनावें यासाठीं खटपट करीत आहे. सर्व कांसार मूळचे क्षत्रिय, जैन पण पेशव्यांच्या जुलमामुळें ब्राह्मणानुयायी झाले अशीं मतें ते प्रतिपादन करीत आहेत. सोलापूरकर जैनकासार पंचमंडळीकडून पुढील महाराष्ट्रीय जैनकासार मंडळीची माहिती आली आहे. “खानेसुमारींत तांबट लोकांनींहि कासार म्हणून लिहून दिलें आहे. सातारा, रत्‍नागिरी, पुणें, बेळगाव, सोलापूर, पंढरपूर, कर्नाटक, निजाम हैद्राबाद, [[अहमदनगर]], [[धुळे जिल्हा|धुळें]], वर्‍हाड वगैरे प्रांतांतील कासार पूर्वीपासून जैनधर्मी असल्यामुळें खानेसुमारींत आपली जात कांहींजणांनी ‘जैन’ म्हणून लिहून दिली आहे; यामुळें लोकसंख्या बरोबर कळत नाहीं. कांसार लोक सोमवंशी आहेत. कांसार व बोगार जातीला म्हणतात. भांडीं विकणारास बोगार म्हणतात. काकणें ( बांगड्या ) विकणारास कांसार म्हणतात.
 
जातीच्या गांवोगांव पंचायती आहेत. विशेष पंचायती धर्माधिकार्‍यांच्या हद्दींतील गांवोगांवचे पंच मिळून धर्माधिकार्‍यांच्या हद्दींतील गांवोगांवचे पंच मिळून धर्माधिकार्‍याच्या सल्ल्यानें करितात. धर्माधिकार्‍यास भट्टारक म्हणतात. कांसारांत भट्टारकांच्या तीन गाद्या आहेत. कारंजा मुक्कामीं एक गादी आहे. तेथील भट्टारकास देवेंद्रकीर्ति म्हणतात. दुसरी गादी मलखेड ( निजामराज्यांत ) येथें आहे. तेथील भट्टारकास रत्‍नकीर्ति म्हणतात. तिसरी गादी हुपस ( कर्नाटकांत ) येथें आहे. येथील भट्टारकास देवेंद्रकीर्ति म्हणतात. कांहीं ठिकाणीं जातीचा अध्यक्ष निवडला जातो. कांहीं ठिकाणीं तो वंशपरंपरेनें असतो. प्रत्येक गावांत जातीचीं देवळें आहेत. त्यांच्या व्यवस्थेकरितां घरें, जमीनजुमला व जंगम मालमत्ता आहे. त्याच्यावर त्या गांवच्या पंचांची सत्ता आहे. त्या मालमत्तेची किंमत नक्की माहीत नाहीं. त्या त्या गांवच्या व शहरच्या मानानें आहे. देवळांत पूजेकरितां पूजारी नेमलेला असतो. तो देवळाच्या व्यवस्थेकरितां योग्यतेनुसार वर्गणी वसूल करीत असतो. धर्माधिकारी वर्षासन वसूल करतात. गांवचे लहानसहान निवाडे लिहून ठेवण्याची पद्धत नाहीं. धर्माधिकार्‍याच्या समक्ष मोठी पंचायत झाल्यास तिचा निवाडा मठांत लिहून ठेवावयाची पूर्वीपासून वहिवट आहे. बहुतकरून गांवचे निवाडे गांवकरीच अमलांत आणतात. जर ते कोणी ऐकले नाहींत तर धर्माधिकार्‍याकडून दंड किंवा शासन म्हणजे बहिष्कारपत्र आणून ते अमलांत आणतात. धर्माधिकारी बहुमतानें नेमलेला असल्यामुळें तो जात पंचायतीच्या निवाड्याप्रमाणें शासन करण्यास पूर्ण अधिकार आहे; सरकारच्या मंजुरीची जरुरी नाहीं. धर्मनियमाविरुद्ध कोणत्याहि व्यक्तींनें वर्तन केल्यास त्याबद्दल प्रश्न येतात. महत्त्वाचे प्रश्न आलेले धर्माधिकार्‍याच्या दप्तरांत मिळतात. या जातीच्या सदृश अशा पंचम, चतुर्थ, सेतवाळ इत्यादि जैनधर्माप्रमाणें वागणार्‍या जाती दक्षिणेंत आहेत. इतर भिन्न जाती पुष्कळ आहेत. जैन जातींत पुष्कळ पोटजाती आहेत. त्यांपैकीं पंचम व चतुर्थाबरोबर बेटीव्यवहार सुरू झाला आहे. जैन जातीबरोबर अन्नोदक व्यवहार चालतो. जातींमध्यें जैन उपाध्यायाकडून विवाहादिक संस्कार करवितात. जातीचे कोणतेहि प्रश्न धर्माप्रमाणे सोडविले जातात. वैदिकधर्मी ब्राह्मणांच्या सल्ल्यांची बिलकुल जरुरी पडत नाहीं. जातीच्या अगर व्यक्तीच्या उद्योगाप्रमाणें व्यक्तीस चातुर्वर्ण्य व्यवस्थेंत स्थान मिळतें. पूर्वीं कांसार ही जात क्षत्रिय होती असें पुराणांच्या आधारें जातीचें म्हणणें आहे. जातीचे कागदपत्र मलखेड होंबुज, कोल्हापूर येथील धर्माधिकारी व सातारा येथें रांगोळे याजकडे आहेत. जातीचा इतिहास महापुराण व कालिकापुराणावरून प्रमाणबद्ध आहे. कालिकापुराण ग्रंथाचा शंभरसव्वाशें वर्षांचा हस्तलिखित पुरावा हजर आहे. गेल्या दोनतीनशें वर्षांत महाराष्ट्र व मध्यप्रांतांत पेशव्यांचा अम्मल असतांना ब्राह्मणांचें तेज या जातीवर पडून ही जात ब्राह्मणानुयायी झाली आहे. त्यावेळीं ब्राह्मणशाही असल्यामुळें जैनधर्माधिकार्‍यांना महाराष्ट्रांत फिरणें, उपदेश करणें व आपली खंडणी वसूल करणें फारच बिकट झालें. त्यामुळें कांसार लोक ब्राह्मणानुयायी झाले आहेत. याजबद्दल पुरावा सातार्‍याचे रांगोळे यांच्या घराण्यांत मिळतो. मलखेडच्या धर्माधिकार्‍यांनीं सातार्‍यास जाऊन कांसारांस “तुम्ही आमचे शिष्य आहात व आम्हांस मानलें पाहिजे’’ असें सांगितलें. त्यानंतर सातारकरांनीं कांही प्रश्न विचारले. त्यांनीं त्यांस समर्पक उत्तरें देऊन मानपान स्वीकार करून घेतले आहे. याबद्दल कोल्हापूर सरकारांत निवाडे झाले आहेत. याबद्दल लेखी कागदपत्र रा. रा. रामभाऊ रांगोळे सातारकर ( हल्लीं मुक्काम बारामती ) यांजकडे आहेत. इंग्रजी राज्यापूर्वी पेशव्यांच्या काळांत जैनधर्मावर गदा आली. तिचा परिणाम अद्यापि दिसून येतो. अलीकडे थोडाबहुत जैनधर्माचा प्रकाश महाराष्ट्रांत कासार मंडळींवर पडत चालला आहे. १९१७ च्या कार्तिकमासीं मलकापुर ( वर्‍हाड प्रांत ) येथें कांसार परिषद भरल्यावेळीं जैनधर्मी व अन्यधर्मी पुष्कळ कासार मंडळींमध्यें शरीरसंबंध, आप्तपणा व भाऊबंदकी जुळली. त्यावेळेंस एका जातीमध्यें धर्म विरोध का ? याबद्दल विचार उत्पन्न झाला. जैनधर्मी कालिकापुराण पुष्कळ मंडळींनीं घेऊन त्याचा विचार मन:पूर्वक चालविला आहे. तारीख ८।६।१८ रोजीं पुणें मुक्कामी शेठ शंकरराव मुरुडकर यांचे अध्यक्षतेखालीं कासार लोकांची सभा भरली त्यावेळी कासार समाजाचा पूर्व इतिहास सांगतेवेळीं आम्ही पूर्वी जैन होतो, तोच धर्म आमचा असावा वगैरे वाटाघाट झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/कासार" पासून हुडकले