"कासार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ?
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''कासार''' - हा शब्द [[तांब्याभांडे|तांब्या]] [[पितळ|पितळेंची]] भांडीं करणें व विकणें हे व्यापार करणारे आणि [[बांगडी|बांगड्याच्या]] धंदा करणार्‍या जातीं यांना लावतात. यांची वस्ती [[मुंबई]] इलाखा, वर्‍हाड, मध्यप्रांत व मध्यहिंदुस्थान यांतून आहे. विशेषत: मुंबई इलाख्यात कांसार वस्ती अधिक आहे. धंदा दोन प्रकारचा एका शब्दानें दर्शविला जातो त्यापैकीं एका प्रकारच्या म्हणजे भांड्याच्या धंद्याला जातिवाचक दोन शब्द; यामुळे आकडे घोटाळ्याचे झाले आहेत. इ. स. १९११ च्या खानेसुमारींत ३६,२२८ तांबट नोंदले गेले, पैकीं २६९१३ मुंबई इलाख्यात, ४५७२ वर्‍हाडमध्यप्रांतांत व ५७४३ मध्यहिंदुस्थानांत होते. यांमध्यें बोगारांचा समावेश नसावा. संस्कृत कांस्यकार शब्दापासून कांसार शब्द बनलेला असावा अशी व्युत्पत्ति कांहीं जणांनीं दिली आहे. ती खरी असल्यास अशी कल्पना सुचते कीं पूर्वी कोशांचें काम करणारा एखादा वर्ग असावा, तो भांडी व बांगड्या करीत असावा व पुढें बांगडी करणारे आणि भांडी करणारे निराळे झाले असावेत आणि त्यानंतर काशांचीं भांडीं जाऊन पितळेचीं आलीं असावींत व काशांच्या बांगड्या जाऊन कांचेच्या आल्या असाव्यात. जातींचे स्पष्टीकरण करण्यास थोडेसें पृथक्करण केलें पाहिजे तें पुढीलप्रमाणें करतां येईल.
 
(१) त्व ष्टा कां सा र.- हीं भांडी करणारी जात. या जातींत समेळ, दांडेकर, कडु, लोंबर, हजारे, गोडांबे ही आडनावें येतात. लोकसंख्या निश्चित नाहीं. कदाचित् पांचपासून दहा हजारपर्यंत असावी. या जातींस तांबटहि म्हणतात. हा कारागिरांचा वर्ग होय. ही जात निवृत्त मांस नाहीं.
 
(२) [[क्षत्रिय]] कां सा र.- या जातीचा धंदा भांडीं विकणें हा होय. करणें नव्हे, हा व्यापार्‍याचा वर्ग होय, कारागिरांचा नव्हे. यांतील काहीं मंडळी जैन आहेत. कांहीं वैष्णव आहेत पण दोघांचा लग्नव्यवहार होतो. याचा धंदा बांगड्या विकणेंहि आहे.सुमारें दोनशें वर्षांपूर्वीं यांत तंटे झाले आणि त्याच्या शाखा पडल्या, व त्यामधील लग्नव्यवहार थांबला. त्यामुळें एक दुसर्‍यास “तगर’’ म्हणूं लागलें. व एक दुसर्‍यांस आपले लोकवळे आहेत असें सांगू लागले. पण आज या संबंधाचा पुरावा नाहीं. या जातींत कंदले, राव, रासने, डागरे, पुसलेकर, वेळापुरे, रागोळे अशीं आडनावें आहेत. ही जात निवृत्तमास आहे. ही नागपूरपासून पुण्यापर्यंत व दक्षिणेकडे सोलापूर बेळगांवपर्यंत पसरली आहे. गोव्यांतील कांसार व हे कासार याच्यांत एकी करण्याची खटपट चालू आहे.
 
(३) पा चा ल कां सा र.- हीं निवृत्तमांस जात आहे. या जातीचीं घरें पुण्यामध्यें पाच पंचवीस असतील. हिचा धंदाहि त्वष्टा कासाराप्रमाणें भांडीं घडविण्याचा आहे. या जातीमध्यें पंडित, भोकरें, जितकर, दस्तुरकर अशीं आडनावें आहेत. यांची वस्ती महाराष्ट्रात चार पांच हजारांहून अधिक नसावी. या तिन्ही जाती कालिकादेवीस आपली देवी समजतात. आणि कालिकापुराणांन उल्लेखिलेली जात आपलीच असें मानतात.
ओळ १४:
कांसार हे कालीचे उपासक आहेत. बहिरीचंडिका, एकवीरा, कुमारिका, खंडोबा. महालक्ष्मी यांहि यांच्या कुलदेवता असतात. सोलापुर वगैरे कांहीं ठिकाणीं जैन कांसार आढळतात. यांचा और्ध्वदैहिक विधि ब्राह्मणांप्रमाणेंच असतो. हे मद्यमांसाशन करितात; पण ब्राह्मणांखेरीज दुसर्‍या जातीच्या हातचें खात नाहींत.
 
ज्ञातींचें मुख्य वस्तीचें ठिकाण मुंबई व [[पुणे|पुणें]] हीं शहरें होत. मुंबईंत आजमासें तीन चार हजार किंवा अधिक वस्ती असून पुण्यांत सुमारें दीड हजार वस्ती आहे. अलिबाग, भिवंडी, पेण, पनवेल, वसई, नासिक व निझामचें राज्य यांतूनहि वस्ती आढळते. मुंबईत, ज्ञातींच्या पंचायती आहेत आणि त्याचप्रमाणें गावोंगांवींहि आहेत. मुंबईतल्या पंचायतीला विशेष महत्व आहे. पंचायतीचा अध्यक्ष मुंबईंत तीन वर्षांनीं निवडला जातो. तो वंशपरंपरेनें निवडला जात नाहीं आणि हाच नियम बहुतकरून सर्व गांवीं लागू आहे. मुंबईमध्यें पायधुणीवर कालीकादेवीचें देऊळ आहे. त्याशिवाय कादेवाडींत तीन चाळी आणि सोनापुरांत एक धर्मशाळा आहे. कालिकादेवीच्या सर्व चाळीच्या उत्पन्नाचा उपयोग ज्ञातीच्या धार्मिक, सामाजिक व इतर उपयुक्त बाबींकडे केला जातो. ह्या सर्व इस्टेटीची किंमत सुमारे तीन चार लाख होईल. त्याचप्रमाणें पुणें, सातारा, पनवेल, पेण, रत्‍नागिरी, उरण, निजामपुरा, किहीम इत्यादि गावांत ठिकठिकाणीं इस्टेटी आहेत. त्या सर्व इस्टेटींचें उत्पन्नाचा विनियोग लोकांच्या खासगी कामाकरितां होत नाहीं. ज्ञातीच्या हक्काचा पूर्वाधारें चालत आलेला ( म्हणजे एक मण ताब्यामागें ) अर्धा पैसा हल्लीं ज्ञातींत एकी नसल्यानें वसूल होत नाहीं. पंचायतीचे निवाडे लिहून ठेवण्याची पद्धत आहे. परंतु ते फार वर्षांचे नाहींत. मध्यंतरीं असलें रेकार्ड विकून टाकिलें. पंचायतीचें निकाल अमलांत आणण्याकरिता बहिष्कृत ठेवणें हें साधन ज्ञातीच्या स्वाधीन आहे. परंतु तें फार दिवस टिकत नाहीं. कारण कांहीं लोक मध्यस्थी करून ते रद्द करवितात. ज्ञातीच्या पंचायतीपुढें ज्ञातीच्या हिताचें प्रश्न येतात. ब्राह्मणाशिवाय इतर जातीबरोबर अन्नोदिक व्यवहार होत नाहीं. ज्ञातींत पोटजाती मुळींच नाहींत. ज्ञातींत मुंज, विवाह इत्यादि संस्कार कोंकणस्थ व देशस्थ ब्राह्मण करितात. ज्ञातींचे प्रश्न जातच सोडविते आणि शास्त्राधारासंबंधानें ब्राह्मणांचा सल्ला घेते पण अशी वेळ फार क्वचित येते. ज्ञातीचें सर्व संस्कार वेदोक्त धर्माप्रमाणे उपाध्यायाकडून करून घेतात. कांही वर्षांपूर्वी आपण ब्राह्मण कीं क्षत्रिय असा प्रश्न निघाला होता पण त्यापासून काहीं निष्पन्न झालें नाहीं. ज्ञातीच्या इतिहासासंबंधानें ज्ञातीची मंडळी येणेंप्रमाणें माहिती देतात:- या ज्ञातीचा जनक त्वष्टा होता. त्वष्टा हा विश्वकर्म्याचा मुलगा होता. विश्वकर्मा हा भुवनाचा पुत्र व बृहस्पतीचा भाचा होता. तो आंगिरा वंशांतला होता. विश्वकर्मा रथकारांचा गुरू असून महातपस्वी होता. मनु, मय, त्वष्टा, शिल्पी व दैवज्ञ ( विश्वज्ञ ) हे पांच देवर्षी होते. हे सर्व विश्वकर्म्याच्या मुखापासून झालेले होते. काष्ट, सुवर्ण, शिल, लोह आणि ताम्र या पांच प्रकारचें शिल्पकर्म करणार्‍या विश्वकर्म्याच्या पांच पुत्रांस, रथकार अशी संज्ञा होती. ह्यांनीं वैदिक कर्मांनें संस्कार करावा व त्यांच्या वंशांत झालेल्यांचाहि उपनयन संस्कार करावा असा अधिकार होता. चार वेद आणि त्यांचीं सहा अंगें ह्या सर्वांनां जाणणारे जे विद्वान ब्राह्मण असतात, त्यांचा जो धर्म वेदांनीं सांगितला तोच धर्म विश्वकर्म्याचा आहे, व त्याच्या वंशांत उत्पन्न झालेल्यांचांहि आहे’’ ( पंचाल ब्राह्मण्य निर्णय पुस्तक पृष्ठें ८६, ८९, १०२). ज्ञातीमधील वृद्ध गृहस्थांच्या तोंडून परंपरागत जी हकीकत सांगण्यांत येते तीवरून पहातां कांसार श्री कालिका देवीचे उपासक व सोमवंशी क्षत्रियकुलोत्पन्न आहेत. या समजुतीला पुष्टि कथाकल्पतरू ग्रंथांतल्या हकीकतीवरून मिळतें. हा ग्रंथ ओवीबद्ध मराठी भाषेंत असून ३०० वर्षांपूर्वी नाशिक क्षेत्रीं कृष्णयाज्ञवल्की नांवाच्या ब्राह्मणानें पुराणग्रंथाच्या माहितीनें लिहिला. त्यांत कार्तवीर्य सहस्त्रार्जुन ह्याचा पुत्र धर्मपाल व चोलराजाची कन्या चंद्रगुप्त ह्या दोघांपासून जे पुत्र झाले तेच पुढें देवीच्या आज्ञेवरून कांस्य, ताम्र वगैरे धातू बनविण्याची कला शिकून त्या कलेचे प्रचारक झाले, व तेव्हांपासून ते कांस्यकारा व कासार ह्या नांवानें लोकांत प्रख्यात झाले अशी कथा दिलेली आहे, व ही कथा पद्मपुराणांतर्गत कालिकामहात्म्यावरून लिहिली आहे, असें कर्त्यानें म्हटलें आहे. त्वष्टा ब्राह्मण आहेत ह्यासंबंधानें बराच उहापोह झाला होता म्हणून आज ज्ञातीचे लोक आपणाला त्वष्टा कासार असें म्हणवितात.
 
गेल्या तीनचारशे वर्षांत ज्ञातींचीं स्थलांतरें धंद्यापरत्वें झालीं परंतु तीं कायमचीं झालीं नाहींत. ज्ञातींत पूनर्विवाह होतो, परंतु तो धनिक किंवा संभावित कुटुंबें करीत नाहींत ज्ञातींत पुरुषास रखेल्यापासून झालेल्या मुलांची जात झालेली नाहीं. ज्ञातींतल्या स्त्रियांस अधर्मव्यवहारानें सजातीय पुरुषांपासून मूल झाल्याचें एकहि उदाहरण आढळून आलें नाहीं. याचीं आडनावें पुढील प्रमाणें आहेत. हजारे, दांडेकर, गोडावे (ध्ये), आर्ते, लोंबर, कडु, पिंपळे, पुरोहित, वाडेकर, येडेकर, त्रिभुवने, शेटे, सोष्टें, तांबडे, समेळ वडके, गोडे, (ड्ये), मुळे, करडे, इनामदार, डेरे, कवळे, पारंगे, इश्वाद, तालीम, तांबट, शिंग्री, पोटफोडे, निजामपूरकर, साप्ते, खुळे, बोसलीकर, डाखणे, तांबट, पाटील, पुसलेकर, साळवी, दवणकर, मांडके, पारिंगे, लांजेकर, देशमुख, पोरे, मोरे, गंभीर, रणशिंगे, रात, बोधे व म्हशेटे.
"https://mr.wikipedia.org/wiki/कासार" पासून हुडकले