"काणे बुवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ २:
जन्म १२ जानेवारी १९३८ (पौष वद्य सप्तमी)
 
महाराष्ट्रातील प्रख्यात बुजुर्ग कीर्तनकार कीर्तनकलाशेखर ह.भ.प. श्री नारायण श्रीपाद काणे. घराण्यातकीर्तनातून अग्निहोत्र पिढ्यांचीप्रचार कीर्तनआणि परंपरा.प्रसार पाचहे पिढ्यांचीबुवांचे कीर्तनपरंपरामुख्य लाभलेल्याकार्य. काणेया बुवांचीमाध्यमातून पूर्णवेळबुवांनी कीर्तनकारिताआजवर वयाच्या १७वेळा व्याभारतभर वर्षांपासूनदौरा ६०केला वर्षांहूनआहे. अधिकशिवपुरी काळअक्कलकोट, सुरुयेथील आहे.स्वामी कीर्तनातूनसमर्थावतार अग्निहोत्रपरम प्रचारसद्गुरू आणिश्री प्रसारगजानन महाराज हे बुवांचे मुख्य कार्यसद्गुरू. याजवळपास माध्यमातून२५ बुवांनीवर्षे आजवरबुवांना त्यांचा वेळाप्रत्यक्ष भारतभरसहवास दौरा केलालाभला आहे.
 
शिवपुरी अक्कलकोट, येथील स्वामी समर्थावतार परम सद्गुरू श्री गजानन महाराज हे बुवांचे सद्गुरू. जवळपास २५ वर्षे बुवांना त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे.
=== कार्याचा परिचय ===
चला करू हरिकथा नाचू रंगू कीर्तनी,
देश धर्म वाढवू, संस्कृती सनातनी..
 
काणे बुवांनी अखिल भारतीय कीर्तन कुलासाठी लिहिलेले व संगीत दिलेले हे अखिल भारतीय कीर्तन कुलाचे घोषगीत म्हणजे बुवांच्या कीर्तन कारकिर्दीचेच नव्हे तर जणू जगण्याचेच ब्रीद ठरले आहे. पूर्णेवेळ कीर्तनकारीता ती सुद्धा व्यावसायिक दृष्टीकोन न ठेवता करणाऱ्या काणे बुवांचा हा अखंड सेवा यज्ञ आज वयाच्या ८० व्या वर्षी देखील अविरत सुरू आहे.
 
कीर्तनकार घराण्याच्या ५ पिढ्यांचा वारसा बुवांना लाभला. वयाच्या १७ व्या वर्षी बुवांनी कीर्तन सेवेला सुरुवात केली. बुवांनी पहिलेच जाहिर कीर्तन सज्जन गडावर श्रीधर स्वामींच्या समोर उत्सवाच्या निमित्ताने सादर केले. श्रीधर स्वामींनी बुवांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवून "मोठे व्हाल, मोठे व्हाल, मोठे व्हाल" असा ३ वेळा उच्चार करून आशिर्वाद दिला. पहिल्याच कीर्तनाला मिळालेल्या या आशिर्वादानंतर बुवांचे भाग्य उजळायचे होते. अक्कलकोट येथील गुरु मंदिरात गुरु पौर्णिमेच्या सप्ताहात बुवांच्या वडिलांची कीर्तने होत असत. एका वर्षी बुवांना तेथे जायचा योग आला. बुवांच्या भाग्यविधात्या सद्गुरुंनीच तो योग घडवून आणला होता. स्वामी समर्थावतार परम सद्गुरू श्री गजानन महाराजांची आणि बुवांची प्रथम भेट गुरुमंदिरातच झाली. अनेक जन्मांची ओळख पटली आणि बुवांच्याच शब्दात सांगायचे तर गुरुमाउलीने त्यांना कुशीत घेतले आणि कृपेचा अखंड वर्षाव सुरु झाला.
 
गुरुंचे कृपाशिर्वाद, पत्नी सुमतीबाई काणे यांची समर्थ साथ यामुळे बुवांच्या कार्याची दिशा स्पष्ट झाली. गुरु आज्ञेचे पालन, प्रखर तपाचरण व सेवेचा अखंड ध्यास यामुळे बुवांची संपूर्ण कीर्तन कारकीर्द आजच्या तरुण व येणाऱ्या सर्व कीर्तनकार पिढ्यांसाठी आदर्श ठरली आहे.
 
कीर्तनाच्या माध्यमातून अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार तसेच लोकसंग्रह या गुरु आज्ञेचे पालन बुवा अगदी तंतोतंतपणे आजही करीत आहेत. अनेक साधकांच्या, प्रचारकांच्या प्रयत्नांमुळे आज अग्निहोत्राचे महत्व शास्त्रज्ञांनी देखील मान्य केले असून जगभरात त्याचा प्रसार होतो आहे. परंतु सुरुवातीच्या काळात बुवा कीर्तनात अग्निहोत्र सांगतात या गोष्टीला विरोध होत असे. अनेक ठिकाणी मानधन वाढवून देऊ पण अग्निहोत्र सांगू नये अशी आयोजकांची मागणी असे. अश्या ठिकाणी बुवांनी ठामपणे नकार देत कीर्तने नाकारली.
 
अनेक कीर्तन शिबिरांमधून बुवांनी विद्यार्थी घडवले आहेत व उत्तम कीर्तनकार तयार केले आहेत. घराण्याची परंपरा नातवंडां पर्यंत पोहोचवली आहे. "देह जावो अथवा राहो" अशी कार्याची तळमळ, "यथा चित्तं, तथा वाच:, यथा वाचस्तथा क्रिया" अशीच आहे. कीर्तनात खरे तेच सांगायचे हि गुरुंची आज्ञा, त्यामुळे ज्या कथा कीर्तनात सांगायच्या त्याचे आचरण स्वत: केले पाहिजे हि बुवांची तळमळ अनेक मंडळीनी जवळून पाहिली आहे.
 
कीर्तन कलेची परंपरा जपणाऱ्या काणे बुवांच्या कीर्तन सेवेची, गुरु भक्तीची निष्ठा या पुढील सर्व कीर्तनकार पिढ्यांसाठी प्रेरणादायी आहे.
 
=== काणे बुवा - कीर्तन वैशिष्ट्ये व सद्गुरुनाथा नमन ===
"https://mr.wikipedia.org/wiki/काणे_बुवा" पासून हुडकले