"काणे बुवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: कीर्तनकलाशेखर नारायण श्रीपाद काणे (काणे बुवा) जन्म १२ जानेवार १९...
(काही फरक नाही)

१६:५६, १४ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

कीर्तनकलाशेखर नारायण श्रीपाद काणे (काणे बुवा) जन्म १२ जानेवार १९३८ (पौष वद्य सप्तमी)

महाराष्ट्रातील प्रख्यात बुजुर्ग कीर्तनकार कीर्तनकलाशेखर ह.भ.प. श्री नारायण श्रीपाद काणे. घराण्यात ५ पिढ्यांची कीर्तन परंपरा. पाच पिढ्यांची कीर्तनपरंपरा लाभलेल्या काणे बुवांची पूर्णवेळ कीर्तनकारिता वयाच्या १७ व्या वर्षांपासून ६० वर्षांहून अधिक काळ सुरु आहे. कीर्तनातून अग्निहोत्र प्रचार आणि प्रसार हे बुवांचे मुख्य कार्य. या माध्यमातून बुवांनी आजवर ३ वेळा भारतभर दौरा केला आहे. शिवपुरी अक्कलकोट, येथील स्वामी समर्थावतार परम सद्गुरू श्री गजानन महाराज हे बुवांचे सद्गुरू. जवळपास २५ वर्षे बुवांना त्यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे.

‘गुरुप्रसाद’, ‘नाना तरंग’, ‘दत्तदरबार’, ‘भरली माझी झोळी’ ह्या ध्वनिफिती, कवितासंग्रह ‘स्पर्श’, ‘ध्यास पाउलांचा’, ‘न्यास पाउलांचा’, तसेच ‘वर्षाव श्री कृपेचा’ हि बुवांची प्रकाशित झालेली पुस्तके आहेत. ‘गीत गजानन’ हे श्री. गजानन महाराजांच्या चरित्रावर आधारित ५६ गीतांच्या संग्रहाचे बुवा गीतकार, संगीतकार व गायक आहेत. ‘गीत समर्थायन’ ह्या समर्थ रामदास स्वामींच्या जीवनचरित्रावर आधारित ४० गीत रचनांचेही ते गीतकार, संगीतकार व गायक आहेत. त्यांनी आजवर लिहिलेली सर्व पदे, स्तोत्रे, अष्टके, रचना यांचा एकत्रित संग्रह ‘गाथा नारायणी’ या नावाने नुकताच प्रसिद्ध झाला आहे. कवठे गुलंद (जि. कोल्हापूर) ते अक्कलकोट हि पायी वारी काणे बुवा गेली ४५ वर्षे करीत आहेत. गेली ४५ वर्षे अनेक पदयात्रींना बरोबर घेऊन बुवांचे हे व्रत अखंडितपणे सुरु आहे.

अधिकृत वेबसाईट: kanebuwa.com