"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎Tiven2240: माहिती
ओळ ११:
नकल-डकव केलेल्या लेखांचा वेगळा वर्ग बनवावा. वेळोवेळी हे उल्लंघन शोधणे सजग संपादक करत राहतील, पण त्याला मर्यादा आहे.यासाठी काही उपकरण/साधन उपलब्ध आहे का? नसल्यास बनविता येईल का याचे तांत्रिक सदस्यांनी मार्गदर्शन करावे.<br>
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १९:२२, ११ एप्रिल २०१८ (IST)
 
इतर ठिकाणच्या मजकुराची नकल-डकव करून बरेच लेख बनवले गेले आहेत, किंवा बनवले जात आहेत याबद्दल कोणाचेही दुमत दिसत नाही. ज्या सजग संपादकांनी हे पुराव्यासहित निदर्शनास आणले ते अभिनंदनास पात्र आहेत. हा मजकूर प्रताधिकारित आहे की मुक्त आहे, याचा शोध कॉपीव्हायोच्या अहवालात दिलेल्या दुव्यावरून घेता येतो. यात विकिपीडिया व काही मुक्त संकेतस्थळे मुळातच वगळलेली आहेत. आता हा शोध कोणी घ्यायचा, त्या त्या संपादकाने की प्रचालकाने हे ठरवायला हवे. तसेच मजकूर काढून टाकण्याच्या बाबतीत जुन्या लेखांना एक नियम तर नवीन लेखांना दुसरा नियम लावणे न्याय्य होणार नाही. जुन्या लेखातील मजकूर बदलण्यासाठी थोडा जास्त अवधी द्यावा, म्हणजेच सूट द्यावी असे काहींना वाटू शकते. पण हे धोरण म्हणून उचित नाही असे वाटते. अशामुळे चुकीचे पायंडे पडू शकतात. माझा प्रस्ताव खालीलप्रमाणे –<br>
# ८०% पेक्षा जास्त मजकूर शंकास्पद असेल तर चर्चेसाठी/तो बदलण्यासाठी दोन दिवस अवधी ठेवावा. त्यानंतर तो तसाच राहिला तर काढून टाकावा. संपादकांना इशारा देण्यात यावा. सलग तीन इशाऱ्यानंतर पुढची कारवाई प्रचालक करू शकतात.
# ८०% पेक्षा कमी मजकूर शंकास्पद असेल तर चर्चेसाठी/तो बदलण्यासाठी सात दिवस अवधी ठेवावा. त्यानंतर तो तसाच राहिला तर काढून टाकावा. संपादकांना इशारा देण्यात यावा. सलग तीन इशाऱ्यानंतर पुढची कारवाई प्रचालक करू शकतात.
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) २१:४२, १३ एप्रिल २०१८ (IST)
 
===Sureshkhole===