"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५६:
 
===संदेश हिवाळे===
मराठी विकिपीडियावर नकल-डकव केलेल्या मजकूराबद्दल तसेच प्रताधिकार व त्यांचे रक्षण करण्याबद्दलची येथील चर्चा महत्त्वपूर्ण आहे. सुरेश खोलेंनी ही चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नकल-डकव मजकूराला बदलने किंवा हटवणे हे दोन प्राथमिक पर्याय सदस्यांकडे असतात. सक्रिय सदस्यांपैकी नकल-डवक कुणी केले असेल तर तो सदस्य ते बदलेलही मात्र ज्या लेखाला कुणी वाली (निर्माणक) नाही, त्यावर कोण काम करणार? याचेही नियोजन करावे लागेल. आणि ३०% पेक्षा जास्त लेखात ही समस्या असू शकते. सुरेश खोलेंनी नातूंना या विषयीच्या प्रश्नांची मोठी यादी बनवली होती, त्याचे नियोजन केल्यास याबाबत काम करण्याची आपल्या सर्वांना योग्य दिशा मिळू शकते. कॉपीपेस्ट मजकूर लेखात नसावाच, मात्र तो झटपट हटवावा इतके मनुष्यबळ आपल्याकडे वाटत नाही. याने विकिपीडियावरील अनेक लेख रिकामे होऊ शकतात, व त्याला विस्तार करणारेही कुणी मिळणार नाही. म्हणून माझे असे प्राथमिक मत आहे की, कॉपीपेस्ट मजकूर हटवण्यापेक्षा त्यात बदल करणे योग्य राहिल. बाकी बहुमताने स्वीकारलेला निर्णय मला मान्य असेल.--[[User:संदेश हिवाळे|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:संदेश हिवाळे|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १९:१८, १३ एप्रिल २०१८ (IST)
 
===अभय नातू===
आत्तापर्यंची चर्चा आणि पावले -
* प्रताधिकारभंग होऊ न देणे आणि झाल्यास त्यावर लगेचच कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
* प्रताधिकारभंग झालेला कळावा यासाठी आता आपल्याकडे साधन आहे (कॉपीव्हायो आणि इतर)
* यावर उपाय करण्यासाठीचे धोरण आपण आखतो आहोत.
 
* नवीन लेखांची कॉपीव्हायोतून पडताळणी करावी
* प्रताधिकारित मजकूर शक्य तितक्या लवकर काढण्यासाठी -
:* शंका असलेला मजकूर टॅग करता यावा. यासाठी {{t|प्रताधिकारित मजकूर शंका}} हा साचा तयार केलेला आहे.
:* वरील चर्चेनुसार जर मूळ लेखकाचे किंवा इतरांचे उत्तर न आल्यास किंवा असा मजकूर बदलला न गेल्यास ३ दिवसांत असा मजकूर काढावा.
::* येथे ध्यानात ठेवण्याची गोष्ट आहे की आंतरजालावर ''विकिपीडियावरुन'' नकल-डकव करणारी डझनावारी (शेकडो?) संकेतस्थळे आहेत. अनेक वृत्तपत्रेही थेट मजकूर चोरतात. विकिपीडियावरील मजकूर मुक्त असल्यामुळे असे करण्यास कायदेशीर प्रतिबंध नाही. असा येथून उचलेला मजकूर जर कॉपीव्हायोमध्ये दिसत असेल तर तो प्रताधिकारभंग ठरत नाही. यासाठी विकिपीडियावरील मजकूराची तारीख आणि इतरत्र असलेल्या मजकूराची तारीख पाहणे आवश्यक आहे.
:*जाणतेपणाने प्रताधिकारभंग करणाऱ्या सदस्यास ताकीद द्यावी
::* ताकीद देउनही पुन्हापुन्हा प्रताधिकारभंग केल्यास सदस्याला काही काळाकरिता अवरुद्ध करावे.
::* अवरुद्धता काळ लोटल्यावर पुन्हा असे झाल्यास सदस्याला कायमचे बॅन करावे.
 
:अजून तीन दिवस (सोमवारपर्यंत) ही चर्चा संपवून धोरण आखणे सुरू होईल.
:[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २०:०९, १३ एप्रिल २०१८ (IST)
 
==नकल डकव प्रस्ताव==