"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
संंदेश पाठवला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५४:
प्रताधिकार भंग गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा आहे ज्याच्याबद्दल गुन्हा करणाऱ्यास प्रताधिकार कायदा, १९५७ कलम ६५ब[http://www.copyright.gov.in/Documents/Copyrightrules1957.pdf Copyright Act, 1957] अन्वये २ वर्षे कारावास आणि दंड यांची तरतूद आहे. ज्या संस्थेकडून या पद्धतीचा गुन्हा घडला असेल त्या संस्थेच्या तत्सबंधी जबाबदार व्यक्तीस (आपल्या संदर्भात प्रचालक) देखील शिक्षेची तरतूद प्रताधिकार कायदा, १९५७ कलम ६९ उपकलम (१) आणि (२) मध्ये करण्यात आली आहे. प्रताधिकार नियमावली, २०१३[http://copyright.gov.in/Copyright_Rules_2013/index.html Copyright Rules 2013] अन्वये अशा पद्धतीचा गुन्ह्यात विकिमिडीया फाउंडेशनला नोटीस बजावत येऊ शकते.
विकिपीडिया क्रिएटिव्ह कॉमन्स अनुज्ञप्ती वापरात असल्यामुळे त्यावरील मजकूर जर आधीच प्रताधिकारीत असेल तर नोटीस बजावली जाऊ शकेल. तसेच विकिमिडीया फाउंडेशन सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आहे त्यामुळे अशा मजकुराला अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील प्रताधिकार कायदा, १९७८[https://www.copyright.gov/title17/title17.pdf Copyright Act, 1978 (USA)] अन्वये गुन्हा मानता येऊ शकते. विकिपीडियाला याबाबत कल्पना आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या इंग्रजीतील धोरणांमध्ये तसा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. म्हणून मराठी विकिपीडियावर नकल-डकव धोरणे कोणीही अडचणीत येण्यापूर्वी लवकरात लवकर लागू करणे अत्यावश्यक आहे. --[[सदस्य:Pushkar Ekbote|Pushkar Ekbote]] ([[सदस्य चर्चा:Pushkar Ekbote|चर्चा]]) १३:५४, १३ एप्रिल २०१८ (IST)
 
===संदेश हिवाळे===
मराठी विकिपीडियावर नकल-डकव केलेल्या मजकूराबद्दल तसेच प्रताधिकार व त्यांचे रक्षण करण्याबद्दलची येथील चर्चा महत्त्वपूर्ण आहे. सुरेश खोलेंनी ही चर्चा घडवून आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. नकल-डकव मजकूराला बदलने किंवा हटवणे हे दोन प्राथमिक पर्याय सदस्यांकडे असतात. सक्रिय सदस्यांपैकी नकल-डवक कुणी केले असेल तर तो सदस्य ते बदलेलही मात्र ज्या लेखाला कुणी वाली (निर्माणक) नाही, त्यावर कोण काम करणार? याचेही नियोजन करावे लागेल. आणि ३०% पेक्षा जास्त लेखात ही समस्या असू शकते. सुरेश खोलेंनी नातूंना या विषयीच्या प्रश्नांची मोठी यादी बनवली होती, त्याचे नियोजन केल्यास याबाबत काम करण्याची आपल्या सर्वांना योग्य दिशा मिळू शकते. कॉपीपेस्ट मजकूर लेखात नसावाच, मात्र तो झटपट हटवावा इतके मनुष्यबळ आपल्याकडे वाटत नाही. याने विकिपीडियावरील अनेक लेख रिकामे होऊ शकतात, व त्याला विस्तार करणारेही कुणी मिळणार नाही. म्हणून माझे असे प्राथमिक मत आहे की, कॉपीपेस्ट मजकूर हटवण्यापेक्षा त्यात बदल करणे योग्य राहिल. बाकी बहुमताने स्वीकारलेला निर्णय मला मान्य असेल.--[[User:संदेश हिवाळे|'''<span style="background color: black; color: orange">संदेश</span><span style="color: blue"> हिवाळे</span>'''<span style="color: green"></span>]]<sup>[[User talk:संदेश हिवाळे|<span style="color: maroon">चर्चा</span>]]</sup> १९:१८, १३ एप्रिल २०१८ (IST)
 
 
==नकल डकव प्रस्ताव==