"आशुतोष जावडेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,२८२ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
डाॅ आशुतोष जावडेकर हे एक मराठी लेखक, कवी, गायक आणि संगीतकार आहेत. त्याव्यतिरिकत ते पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातले दंतचिकित्सक आहेत.
 
आशुतोष जावडेकर हे इंग्रजी साहित्यामध्ये प्रथम क्रमांक घेऊन पुणे विद्यापीठातून एम.ए झाले आहेत. त्यांचे 'नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले' हे बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक विशेष प्रसिद्ध आहे. त्यांनी अखिल भारतीय साहित्य संमेलनासारख्या अनेक व्यासपीठांवर कवितांचे आणि गाण्यांचे सादरीकरण केले आहे. चर्चाविश्व समिक्षा व स्थलांतर वाङ्ग्मय हे त्यांचे अभ्यासविषय आहेत. त्यांवर त्यांचे इंग्रजी शोधनिबंधही आहेत. त्यांनी साम टीव्ही, IBN लोकमत इत्यादी दूरचित्र वाहिन्यांवर मुलाखतींत व परिसंवादांत भाग घेतला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rajhansprakashan.com/node/148|title=डॉ. आशुतोष जावडेकर {{!}} राजहंस प्रकाशन|website=www.rajhansprakashan.com|language=mr|access-date=2018-04-12}}</ref>
 
==कौटुंबिक==
आशुतोष जावडेकरांचे वडील प्रकाश जावडेकर हे भारताच्या केंद्र सरकारमध्ये मंत्री असून, आई डाॅ. प्राची जावडेकर या नामवंत शिक्षणतज्ञ, संशोधक आणि शिक्षण सल्लागार आहेत. त्या पूर्वी पुण्यातील इंदिरा इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेन्टच्या प्रमुख होत्या. आशुतोष जावडेकरांच्या भगिनी अपूर्वा जावडेकर यांनी बोस्टन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएच.डी केले आहे.
 
==जावडेकरांचे साहित्य==
* नवे सूर अन् नवे तराणे : संगीत आजच्या काळातले (बदलत्या संगीताचा वेध घेणारे पुस्तक)
* मुळारंभ (जागतिकीकरणाच्या आरंभ आणि तत्कालीन तरुण पिढीवर भाष्य करणारी कादंबरी)
* लयपश्चिमा (पाश्चात्त्य संगीताचा परिचय करून देणारे पुस्तक) (दैनिक लोकसत्तात प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन). (या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद प्रसिद्धीच्या मार्गावर आहे.)
 
==जावडेकरांचे संगीत दिग्दर्शन==
[[वर्ग:मराठी संगीतकार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
 
 
 
 
(अपूर्ण)
५५,४८१

संपादने