"पिकू (मासा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''पिकू''' या माशाचा समावेश सायप्रिनोडोंटिफॉर्मिस गणाच्या सायप्रि...
 
No edit summary
ओळ १:
'''पिकू''' या माशाचा समावेश सायप्रिनोडोंटिफॉर्मिस गणाच्या सायप्रिनोडोंटिडी मत्स्यकुलात करतात. अप्‍लोकाइलस लिनीअटस हे त्याचे शास्त्रीय नाव हे. तो ‘झिर’ या नावानेही ओळखत जातो. त्याची लांबी साधारणत: ८-१० सेंमी. असून जाडी हाताच्या करंगळीएवढी असते. हा मुख्यत: गोड्या पाण्यातील मासा आहे; परंतु थोड्या खार्‍या (मचूळ) पाण्यातही तो राहू शकतो. त्याच्या डोक्यावर प्रकाशात चमकणारा एक ठिपका असतो. त्यामुळे काही मच्छीमार त्याला ‘वरडोळ्या’ तर काही, त्याच्या पाण्याच्या पृष्ठभागावर शिकारीची वाट पाहत निश्चल राहण्याच्या सवयीमुळे ‘तरंग्या’ असेही म्हणतात. ‘टॉपमिनो’ असे त्याचे इंग्रजी नाव आहे. हा मासा लहान असला, तरी त्याचे खरे महत्व डासांच्या अळ्या खाण्याच्या त्याच्या पटाईतपणात आहे. पाण्याच्या पृष्ठभागावर फिरण्याच्या त्याच्या नेहमीच्या सवयीमुळे व डासांच्या अळ्या खाण्याच्या त्याच्या विशिष्ट आवडीमुळे अळ्यांच्या नाशाच्या कामी तो फार उपयोगी पडतो. अगदी उथळ पाण्यात जाण्याची सवय व मचूळ आणि थोड्या उष्णही पाण्यात शिरण्याची पात्रता त्याच्या ठिकाणी असल्यामुळे तलावांच्या सान्निध्यातिल किंवा नदीकाठच्या गावांच्या सार्वजनिक आरोग्याच्या व डासांचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने हा एक महत्वाचा मासा मानला जातो; त्याचा उपयोग योग्य रीतीने केला पाहिजे.
 
==वर्णन==
पिकू जातीचा नर मादीपेक्षा जास्त शोभिवंत असतो. त्याच्या अंगावर उभे काळे पट्टे असतात व खवल्यांवर बारीक लाल टिपके असतात. पक्ष (नर) रंगीत असतात. विशेषत: पुच्छपक्ष (शेपटीचा पर) तांबूस लालसर रंगाचा असतो. त्यामुळे हा घरगुती मत्स्यपात्रांत (काचेच्या पात्रात तयार केलेल्या जलजीवालयांत) ठेवण्यास उपयुक्त असतो. त्यासाठी त्याला सर्वत्र मागणी असते. मात्र त्याला काचपात्रातून बाहेर उडी मारण्याची सवय असल्यामुळे पात्रावर झाकण ठेवणे आवश्यक असते.