"विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे/नकल-डकव धोरणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
माझी मते मांडली.
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ ९:
नकल-डकव केलेल्या लेखांचा वेगळा वर्ग बनवावा. वेळोवेळी हे उल्लंघन शोधणे सजग संपादक करत राहतील, पण त्याला मर्यादा आहे.यासाठी काही उपकरण/साधन उपलब्ध आहे का? नसल्यास बनविता येईल का याचे तांत्रिक सदस्यांनी मार्गदर्शन करावे.<br>
--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १९:२२, ११ एप्रिल २०१८ (IST)
 
 
=नकल-डकव केलेल्या मजकूराबद्दल सध्या चर्चा सुरू झाली आहे याबद्दल आपले आभार चर्चा पुढे नेताना निम्नोक्त मुद्यांचा विचार व्हावा असे वाटते=
सगळ्यात प्रथम ही धोरणे ठरवताना आपल्याला नकल-डकव चालवून घेणेच शक्य नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे, तांत्रिकपातळीवर आणि कायदे पातळीवर ते विकीच्या आणि भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या अंतर्गत नकल-डकव हा गुऩाह आहे हे ध्यानात ठेऊन फ़ार-फ़ारतर आपण त्यावर कारवाई करण्याची वेळ वाढवू शकतो आणि त्यात जास्त पारदर्शीता आणू शकतो.
नकल-डकव बाबत मला इंग्रजी विकीवरील धोरणे आपल्या समूदायाचा विचार करुन थोड्याफ़ार फ़रकाने लागू करणे शक्य आहे असे मला वाटते त्यामध्ये खालील बाबींचा समावेश होऊ शकतो.<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-03-13|title=Wikipedia:Copyright violations|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Wikipedia:Copyright_violations&oldid=830154292|journal=Wikipedia|language=en}}</ref>
* नकल-डकव मजकूर कुठल्याच विकीवर चालवून घेतला जात नाही, कारण त्यामुळे विकीच्या मुक्तस्त्रोत असण्याला बाधा निर्माण होते आणि विकीवर पर्यायाने ती संपादने करणाऱ्या सदस्यावर कोपीराईट कायद्यांचे उल्ल्ंघन केल्याचा आरोप आणि परिणामस्वरुप कारवाईसुध्दा केली जाऊ शकते. त्यामुळे इंग्रजी विकीवर याबाबत कडक नियम आणि ताबडतोब कारवाईअ केली जाते. त्याच मार्गाने आपल्याला मराठीमध्येही तेच धोरण लागू करणे आवश्यक राहिल. त्यामध्ये फ़क्त विहीत प्रक्रियेत जी वेळ मर्यादा इतर विकींवर पाळली जाते त्यापेक्षा जास्त वेळ मर्यादा आपण घेण्याचे स्वातंत्र्य आपल्याला घेता येईल.
* इंग्रजी विकीवर नकल-डकव मजकूर सापडल्यास तो जर स्पष्टरित्या प्रताधिकार भंग आहे असे समोर आल्यास लक्षात येता क्षणी तो काढून टाकला जातो, एवढेच नव्हे तर त्या मजकूराचा इतिहासही काढून टाकला जातो.(RD2)<ref>{{जर्नल स्रोत|date=2018-04-04|title=Wikipedia:Revision deletion|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Wikipedia:Revision_deletion&oldid=834174035|journal=Wikipedia|language=en}}</ref>
* नकल-डकव मजकूराबाबत शंका असतील काही काळापुरते तो झाकला जाऊन त्यावर चर्चा होऊन मग तो काढला जातो. पण ही प्रक्रिया सुध्दा तो लेख ज्या प्रकल्पाचा भाग आहे त्या प्रकल्पावर लक्ष देणारे लोक कटाक्षाने करत असतात. तरिसुध्दा फ़ारतर आठवडा भरात त्यावर निकाल होताना मी पाहिले आहे. इतर सदस्यांनी आपली मते ह्यावर द्यायला हरकत नाही.
* मुळात कोपीव्हायो सारखी अवजारे मराठी फ़ारसी वापरली जात नव्हती, संदर्भ देण्य़ाची साधने आपल्याकडे नव्हती पण आता ही सर्व प्रकारची हळूहळू आपल्याकडे उपलब्ध होत असताना आपण कुठल्याच प्रकारची गय सदस्यांनी केलेल्या चुकीबाबत आपण न करता नकल-डकव मजकूराच्या प्रश्नाबाबता कडक कारवाई करायला हरकत नाहीये.
* त्यामुळे साचा लावल्यावर, कोपीव्हायो साच्यामध्ये नकल-डकव प्रत्यक्ष सिध्द होते आणि समोर दिसते, त्यामुळे अश्या परिस्थीतीमध्ये तो मजकूर तातडीने काढून टाकला गेला जावा असे माझे मत अहे. शिवाय कोपीव्हायो नकल-डकवच्या शंकेची टक्केवारी दाखवतेच, ती शंका जर 50% पेक्षा जास्त असल्यास ताबडतोब तो मजकूर हटवण्यात यावा असे मला वाटते. उदाहरणादाखल, [[शिवकालीन शस्त्रभांडार|शिवकालीन शस्त्र भांडार]] असा लेख, जो अनअनुभवी सदस्यांनी केल्या असल्याने तो सबंध लेखच नकल-डकव आहे, अश्या नवोदित सदस्यांना एका बाजूला हे सांगणे की, प्रताधिकार भंग काय आहे? आणि दुसऱ्या बाजूला तो मजकूर लागलीच काढून टाकणे ह्या दोनींही बाबी तेव्हढ्याच महत्त्वाच्या आहेत असे मला वाटते.
* 50% पेक्षा कमी शंका असलेल्या मजकूराला एक आठवडा चर्चेसाठी वाव दिला जाऊन मग त्यावर काहीच क्रिया सदस्यांकडून न झाल्यास प्रचालक/अनुभवी सदस्यांनी तो मजकूर हटवावा.
* इंग्रजीवर नकल-डकव केल्याचा इतिहास असलेल्या सदस्यांना चौकशीला सामोरे जावे लागते ज्यामध्ये जर वारंवार त्यांच्याकडून असे केले गेल्याचे समोर आल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. आणि आवश्यकतेनुसार त्यांना अवरुध्दही केले जाते. त्याच धर्तीवर आपण त्याबाबतची धोरणेही ठरवू शकतो, ज्यामध्ये वारंवार नकल-डकव केल्याचे ज्यांच्या बाबत लक्षात येईल त्यांच्यावर कारवाई केली जावी असेही मला वाटते.
त्यासाठी, पहिल्या 1 ते 3 नकल-डकव परिस्थींमध्ये त्या सदस्याला त्याच्या मुद्दाम किंवा नजरचुकीने झालेल्या नकल-डकव संपादनाबद्दल जाणिव करुन देणे आणि 3 ते 10 नकल-डकव संपादना पर्यंत मजकूराच्या आकारानुसार काही दिवसांपासून ते अनंत काळापर्यंत अवरुध्द करणे, हे धोरण आपल्यालाही थोड्या फ़ार फ़रकाने लागू करता येईल.
* शिवाय इंग्रजीवर कोपीव्हायो क्लर्क नावाच्या खास अधिकार असलेल्या सदस्यांची सोय असते आपल्या मराठीसाठी अश्या काही अनुभवी सदस्यांचा विचार करुन त्यांना कोपीव्हायो क्लर्क म्हणून नेमता येऊ शकते.
* सध्या मी केलेल्या शोधामध्ये मला जशी समोर येतील तश्या क्रमाने मी लेखांना हा कोपीव्हायोने तपासून नातूंनी नव्याने तयार केलेला साचा लावला आहे, परंतू पुढच्या वेळीपासून येणारा प्रत्येक लेख ह्या अवजाराखालूनच तपासूनच घेतला गेला पाहिजे असाही मी प्रस्ताव समोर ठेवत आहे. जे इतर विकींवर आवश्यक प्रक्रियेचा भाग म्हणून केलेच जाते.
* सध्या सापडत असलेल्या मजकूराची व्याप्ती पहाता असा मजकूर मराठी विकीवर मोठ्याप्रमाणात अस्तित्त्वात आहे हे जरी समोर येत राहिले तरी मला त्यात समाधान आहे, कारण एकदा साचे लावले की त्यावर कधीतरी कारवाई करणे आवश्यक राहिलच.
 
=प्रताधिकार भंग शंका साचा लावत असताना मला काही तांत्रिक बाबी समोर आल्या ज्यांतून खालील सूचना=
# साचा लावताना तो लावल्याची तारिख त्यावर यावी आणि त्यानुसार त्या तारखेची यादी तयार होत राहावी असे मला वाटते जेणेकरुन त्याच्या पुढच्या कारवाईचा मार्ग सोपा होईल.
# साचा लावताना त्याच्या नकल-डकवची टक्केवारी सुध्दा उल्लेखता यावी अशी सोय साच्यात करता आली तर उत्तमच.
# जर वारंवार एखाद्या सदस्याकडून नकल-डकव केले जात असेल तर त्या लेखकांच्या सदस्य पानावर किंवा कुठेतरी याची नोंद करत रहावे लागेल त्यातूनच नकल-डकव करणारे सदस्य शेवटी थांबवता येतील.
 
शेवटाकडे, लेखांच्या प्रतवारीचे धोरण जर लागलीच निर्माण झाले तर नकल-डकव आणि उल्लेखनीयता बाबतचे अनेक प्रश्न प्रतवारीमध्येच सुटतील. तेव्हा दरवेळी शाब्दीक चकमकींमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा जर, व्यवस्थात्मक पातळीवरच विकीच्या मानांकाच्या पालनाचा आग्रह धरल्यास, संदर्भ, उल्लेखनीयता, नकल-डकव हे सगळेच प्रश्न सुटायला सोपे होतील. इतरांची मते ऐकायला आवडेल. [[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) २०:३२, ११ एप्रिल २०१८ (IST)