"अळिंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''मशरूम''' ही [[बुरशी]] गटातील [[वनस्पती]] आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.
 
निसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने [[पूर्व आशिया]], [[तैवान]], [[चीन]], [[कोरिया]], [[इंडोनेशिया]] या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात[[युरोप]]ात, २७% [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेत]] व १४% पूर्व [[आशिया]] खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये[[जर्मनी]]मध्ये होते.{{संदर्भ}}
 
भारतामध्ये बटन मशरूम (''Agaricus bisporus''), शिंपला मशरूम (''pleurotus sp.'') व धानपेंढ्यांवरील Volvariella volvacea या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.
 
==बटन मशरूम==
[[हिमाचल प्रदेश]], [[आसाम]], [[पंजाब]] या थंड प्रदेशांत बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणावर होते. ही लागवड कंपोस्ट खतांवर करतात. दीर्घ मुदतीच्या पद्धतीने (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्धतीने (१६ ते १८ दिवस) [[कंपोस्ट खत]] तयार करतात. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण करतात. कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बटन मशरूमचे बी पॆरतात. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर त्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खत, [[माती]], [[वाळू]] यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो. या उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते.
 
==शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम, हिंदीत ढिंगरी मशरूम)==
धिंगरीशिंपला मशरूमची (धिंगरी मशरूम, हिंदीत ढिंगरी मशरूम) लागवड भारतातील नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आर्द्रता ८०-८५%) वर्षाचे ८-१० महिने करता येते.
 
संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड हॊथे. ही लागवड बटन मशरूमच्या लागवडीपेक्षा कमी खर्चाची व त्यामुळे अधिकव किफायतशीर आहे. अत्यंत छोट्या जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो. धिंगरी मशरूमसाठी थोडे पाणी लागते. फक्त २०० लिटर पाणी उपलब्ध असतानासुद्धा धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेता येते.
 
==संदर्भ==
[http://mr.vikaspedia.in/agriculture/agri_Support/92e93693094292e-913933916]
 
[[वर्ग:शेतीपूरक व्यवसाय]]
"https://mr.wikipedia.org/wiki/अळिंबी" पासून हुडकले