"अळिंबी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ६:
==बटन मशरूम==
बटन मशरूमची लागवड मोठ्या प्रमाणात [[हिमाचल प्रदेश]], [[आसाम]], [[पंजाब]] या प्रदेशात केली जाते. बटन मशरूमची लागवड कंपोस्ट खतांवर केली जाते. दीर्घ मुदतीची पद्दत (२६-२८ दिवस) किंवा कमी मुदतीच्या पद्दतीने (१६ ते १८ दिवस) [[कंपोस्ट खत]] तयार केले जाते. ते पिशव्यांमध्ये भरून त्यांचे निर्जंतुकीकरण केले जाते. कंपोस्टच्या वजनाच्या ५% ते १०% या प्रमाणात बी पेरले जाते. १२-१५ दिवसाने बुरशीची वाढ झाल्यावर दीड इंच जाडीचा कंपोस्ट खत, [[माती]], [[वाळू]] यांच्या निर्जंतुक मिश्रणाचा थर द्यावा लागतो व उत्त्पादनाकरिता तापमान १२ अंश सेल्सिअस लागते.
==शिंपला मशरूम (धिंगरी मशरूम)==
नैसर्गिक वातावरणात (तापमान २० अंश ते ३० अंश सेल्सिअस व आद्रता ८०-८५%) या मशरूमची लागवड ८-१० महिने करता येते.
संपूर्ण भारतात या मशरूमची लागवड करतात. [[धिंगरी अळंबी]] (मशरूमची) लागवड बटन मशरूमपेक्षा अल्पखर्चिक व किफायतशीर आहे. अत्यंत अल्प जागेत अधिक पैसे खर्च न करता उत्तम उत्त्पन्न देणारी जात म्हणून शिंपला मशरूमचा उल्लेख केला जातो.धिंगरी मशरूमच्या उत्त्पन्नाकरिता अल्प पाणी लागते. ही अत्यंत महत्वाची बाब आहे. २०० लि. पाणी असतानासुद्धा आपण धिंगरी आळंबीचे उत्पादन घेऊ शकतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/अळिंबी" पासून हुडकले