"जमशेटजी जीजीभाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
लेखाला एकही संदर्भ नाही
ओळ १:
जमशेटजी जीजीभाय (Sir Jamsetji Jijibhoy किंवा Sir Jamshedji Jeejeebhoy) (जन्म : मुंबई १५ जुलै १७८३; मृत्यू : मुंबई, १४ एप्रिल १८५९) हे दानशूरपणाबद्दल प्रसिद्ध असलेले मुंबईतील एक पारशी उद्योगपती होते. त्यांनी मुंबईकरांसाठी अनेक लोककल्याणकारी कामे केली.{{संदर्भ हवा}}
 
मुंबईचे माहीम बेट, साष्टी -Salsette- बेटावरील वांद्र्‍याला जोडणारा ‘माहीम कॉजवे’ जमशेटजींच्या पत्नी अवाबाई यांनी दीड कोटी रुपयांची मदत केली म्हणून १८४५ साली बांधून झाला. जमशेटजींच्या एक लाख रुपयांच्या आर्थिक मदतीमुळे मुंबईचे ‘जे. जे. हॉस्पिटल’ उभे राहिले. राणीच्या बागेतील ‘डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम’ (व्हिक्टोरिया ॲन्ड अल्बर्ट म्युझियम)ची इमारत जमशेटजी जीजीभाय यांच्या उदार देणगीतून उभी राहिली. जमशेटजींनी दिलेल्या दीड लाख रुपयांच्या देणगीतून १८३१ साली उभी राहिलेली बेलासिस रोड (नवीन अप्रचलित नाव जहांगीर बोमन बेहराम मार्ग) येथील धर्मशाळा आजही कार्यरत आहे.{{संदर्भ हवा}}
 
जमशेटजींच्या मोठमोठ्या देणग्यांमधून उभ्या राहिलेल्या सार्वजनिक आणि धर्मादाय संस्थांची संख्या १२६ हून अधिक आहे. त्यामध्ये जे.जे. स्कूल ऑफ आर्ट, जे.जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर, जे.जे. स्कूल ऑफ कमर्शियल आर्ट यांचाही समावेश होतो.{{संदर्भ हवा}}
 
जीजीभायनी सुरत, नवसारी, मुंबई आणि पुण्यात रुग्णालये, शाळा, अग्यारी वगैरे स्थापन करून विहिरी तसेच तलाव खोदले. त्यांनी पांजरापोळ या संस्थेस गुरांच्या पैदाशीसाठी ८०,००० रुपयांची देणगी दिली. मुंबईतल्या ठाकुरद्वार येथे जमशेटजींनी गुरांच्या मोफत चरणीसाठी २०,००० रुपये देऊन समुद्रकाठाजवळ जमीन घेतली. पुढे याच ठिकाणी ‘चर्नी रोड’ हे रेल्वे स्थानक झाले.{{संदर्भ हवा}}
 
==पुरस्कार आणि सन्मान==
जमशेटजींच्या या समाजहितकारी कार्याची पावती म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना ‘नाइटहूड’ व ‘बॅरोनेट’चा बहुमान दिला.. हा मान मिळालेले जमशेटजी हे पहिले भारतीय होत.{{संदर्भ हवा}}
 
जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात जमशेटजी जीजीभाय यांचा भव्य पुतळा उभारला आहे.
 
जे.जे. हॉस्पिटलच्या आवारात जमशेटजी जीजीभाय यांचा भव्य पुतळा उभारला आहे.{{संदर्भ हवा}}
 
[[वर्ग:मुंबई]]