"अक्षय्य तृतीया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ५०:
== इतर ==
या दिवशी बद्रीधाम येथील बद्रीनारायणाच्या मंदिरात सहा महिन्यांच्या बंदकालानंतर प्रथम प्रवेश मिळतो. अयोध्येजवळच्या [[वृंदावन|वृंदावनात]] कुंजबिहारी [[श्रीकृष्ण]] मंदिराचे दरवाजेपण याच दिवशी उघडले जातात. अक्षयतृतीया ही [[विष्णु|विष्णूचा]] एक अवतार समजल्या जाणाऱ्या [[परशुराम|परशुरामाची]] जन्मतिथी आहे.
या दिवशी स्त्रिया जलकुंभाची पूजा करून तो जलकुंभ दान देतात. तसे पहिले, तर आल्या-गेल्याला, तहानलेल्याला पाणी द्यावे, त्याचे हे प्रतिक ! अक्षय्य्तृतीय वौशाखत येते. त्या वेळी उन्हाची तीव्रता वाढलेली असते. त्यासाठीच आपल्या संस्कृतीने जलदानाचे महत्त्व सांगितले आहे. या दिवसापासून (खर म्हणजे उन्हाळा सुरु झाला, की लगेच,ठिकठिकाणी पाणपोया काढाव्यात. पांथस्थंची, गुरा – ढोरांची तहान भागवून त्यांची सेवा करावी. एवढेच नाही; तर प्रखर तापाने सुकून जाणाऱ्या वृक्ष – वेलींनाही पाणी घालावे व त्यानाही जीवन-दान द्यावे. जलकुंभ दान करण्याबरोबर उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी गरजूंना पंखा, छत्री, पादत्राणेही दान करावीत, असे सांगितले आहे. अक्षय्यतृतीया हा दिवस वसंतोत्सवाचा आहे चैत्र शुद्ध तृतीयेपासून अक्षय्यतृतीयेपर्यंत वसंतगौरीचा उत्सव देवीच्या देवळातून साजरा केला जातो. मथुरा, वृंदावन, काशी, व्दारका या ठिकाणच्या देवालयातून हे उत्सव उत्साहाने साजरे केले जातात.चैत्र शुद्ध तृतीयेला माहेरी आलेली गौरी महिनाभर राहून यादिवशी सासरी जाते, असा समज आहे. त्यामुळे स्त्रिया घरोघर हळदी-कुंकू करतात. खेडेगावातील स्त्रिया हा सण अत्यंत आनंदाने, उत्साहाने साजरा करतात. सकाळी आंघोळी झाल्या, की नंतर रस्त्यातून गाणी गातात गौरी विसर्जन करतात. गौरीला नैवेद्य म्हणून गोडाचे जेवण करतात. त्या झोक्यातून, त्या गीतातून मनामनातून उचंबळून आलेल्या आनंदाने कारंजी थुइथुइ नाचत असतात.
 
== हेही पहा ==