"अमावास्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
भरपूर
(चर्चा | योगदान)
,,
ओळ १:
[[चित्र:New moon symbol.svg|इवलेसे|उजवे|अमावास्येच्या रात्रीचा चंद्र]]
 
'''{{लेखनाव}}''' ही हिंदू पद्धतीतील चांद्रमासिक कालमापनातील एकतिसावी तिथी आहे. ज्यावेळी पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग न दिसता अप्रकाशित भाग दिसतो, ती तिथी अमावस्या असते. (अमा-सह, वस-राहणे). 'सूर्याचन्द्रमसोर्य: पर: सन्निकर्ष: सामावास्या' (=सूर्य-चंद्रांच्या परम सान्निध्याला अमावस्या म्हणावे) असे गोभिल सांगतो. ज्या तिथीला चंद्र दिसत नाही, ती अमावस्या, अशी व्याख्या मिताक्षरेत सांगितली आहे. अमान्त पंचांग पाळणाऱ्या महाराष्ट्र-गुजराथ-कर्नाटकांत अमावास्येच्या नंतर येणाऱ्या प्रतिपदेपासून पुढचा (चांद्र)महिना सुरू होतो.
 
अमावस्येचा उल्लेख ऋग्वेदात आढळत नाही. पण सूर्यग्रहण अमावस्येलाच होते आणि अनेक ज्योतिर्विदांच्या मते ग्रहणाचा उल्लेख ऋग्वेदात आहे. वेदातील त्या प्रस्तुत सूक्तात सूर्याला ग्रासणाऱ्या स्वर्भानूला अत्री ऋषींनी शोधून काढले, असे म्हटले आहे. यावरून अत्रीने सूर्यग्रहणाचे ज्योतिषशास्त्रदृष्ट्या स्पष्टीकरण केले, असे वाटते. त्याला अमावस्या ज्ञात असली पाहिजे.