"मधुकर केशव ढवळीकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:कंधारजवळील मानसपुरी येथील उत्खनन स्थळ.JPG|right|thumb|250px|डॉ. ढवळीकरांनी क्षेत्रपालाच्या मूर्तीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी [[कंधारचा किल्ला|कंधारच्या किल्ल्याजवळील]] मानसपुरी येथे केलेल्या उत्खननाची जागा]]
डॉ. '''मधुकर केशव ढवळीकर''' (जन्म : पाटस-पुणे, १६ मे, इ..स. १९३० - मृत्यू २७ मार्च २०१८) हे [[पद्मश्री पुरस्कार]]विजेते भारतीय पुरातत्त्वज्ञ होते. [[भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण|भारतीय पुरातत्त्व विभागामध्ये]] त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. डेक्कन कॉलेज पुणे इथे संचालक म्हणून १९९० पर्यंत कार्यरत होते
 
पुणे विद्यापीठातून १९५८ मध्ये ढवळीकर यांनी एम.ए. ही पदवी पहिल्या वर्गात सर्वप्रथम येऊन मिळवली आणि नंतर तेथेच पीएच.डी.साठीचे संशोधनही केले. [[भारतीय पुरातत्‍व सर्वेक्षण|भारतीय पुरातत्त्व विभागात]] त्यांनी कामाला सुरुवात केली आणि नंतर नागपूर विद्यापीठात प्रपाठक म्हणूनही काम केले. त्यानंतरचा सारा काळ डेक्कन कॉलेज या संस्थेतच व्यतीत केला. पुरातत्त्वशास्त्राच्या अध्यापनात प्रत्यक्ष संशोधनाला फारच महत्त्व असते. ठिकठिकाणी जाऊन उत्खनन करून इतिहासाची उलगड करणे हे काम कष्टाचे असते. डॉ. ढवळीकर यांनी भारतातील अनेक ठिकाणी असे उत्खनन करण्यात पुढाकार घेतला. भारत आणि ग्रीस या दोन्ही ठिकाणच्या संस्कृतींचा उदय एकाच कालखंडातील मानला जातो. त्यामुळे त्या देशातील उत्खननाचा भारतीय संदर्भात अभ्यास करण्याची संधीही त्यांना मिळाली. भारत सरकारने त्यांना ग्रीसमधील पेला या ठिकाणच्या उत्खननासाठी मुद्दाम पाठवले होते.
 
[[इनामगांव (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)‎|इनामगावाचे]] उत्खनन प्रकल्प हे त्यांचेतढवळीकरांचे नावाजलेले प्रमुख नावाजलेले कार्य होय. इ.स.१९६८ ते इ.स.१९८३ दरम्यान बारा टप्प्यांत त्यांनी हे संशोधन केले. त्यांनी हडप्पा समकालीन [[गुजरात]]मध्ये मोरवीजवळ कुंतासी येथेही संशोधन केले. [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्राज्यातील]] राजांची सोन्याची नाणी यावर त्यांचे विशेष [[संशोधन]] केलेहोते. [[नांदेड]] येथील [[राष्ट्रकूट|राष्ट्रकूटांच्या]] [[राजधानी]]वरही त्यांनी संशोधन केले. तसेच [[कंधार (पुरातत्त्वीय उत्खनन स्थळ)|कंधार]] येथे [[पुरातत्त्वीय उत्खनन]] करून तेथील क्षेत्रपालाच्या विशालकाय मूर्तीवर प्रकाशझोत टाकला.
 
मधुकर केशव ढवळीकर हे पुण्यातील डेक्कन कॉलेज येथे संचालक म्हणून ते १९९० पर्यंत कार्यरत होते
 
==ढवळीकरांनी लिहिलेली मराठी पुस्तके==
Line १६ ⟶ १९:
* महाराष्ट्राची कुळकथा
 
==ढवळीकरांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके==
* Apegaon Excavations: Report of the Excavation at Apegaon: 1976
* Aryans: Myth and Archaeology