"टिपऱ्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २:
==इतिहास==
टिपऱ्याचा खेळ हा एक प्राचीन खेळ आहे. श्री कृष्ण गोकुळात गोपींबरोबर टिपऱ्या खेळल्याची वर्णने आहेत. महाराष्ट्रातल्या कित्येक कृष्णाच्या टिपरी खेळावर अभंग किंवा पोवाडे आहेत.
खेळसी टिपऱ्या घाईरे | वाचे हरीनाम गाई रे |
टिपरीस टिपरी चुंकू जाता बाई|
पडसी यमाच्या घाई रे ||१||
सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे |
एका खेळादोन्ही गुंतला | यमाजी घालील डोळा रे |
वाया खेळ खेळतोसी बाळा रे | सावध होईपाहे डोळा रे |
एका जनार्दनी शरण जाता |
चूकशील कळी काळा रे ||३||
या खेळात दहा – बारा माणसे फेर धरून नाचतात व नाचताना आपल्या डाव्या – उजव्या बाजूच्या नर्तकांच्या टिपरीवर आळीपाळीने आपल्या टिपरीचा आघात करतात. काही ठिकाणी खेळाच्या आरंभी दोन-दोन नर्तक एकमेकांकडे तोंड करून उभे राहतात व परस्परांच्या टिपरीवर आघात करून नाचू लागतात. या नाचाच्या अनेक भिन्न गती असून , त्या करताना भिन्न गीते म्हणतात. त्यातील काही गीते अशी –
१) एक टिपरी घे दुसरीस मार गे,तिसरी घेऊन चौथीला|
पाचवी घेऊन साहवी फिर गे,सातवी बदल ||
२) राधाकृष्ण गे कुंजविहारी, मुरलीधर गोवर्धनधारी |
३) हरीस खेळता आनंद चित्ता हरिगुण गाता,
अघटित रे | धावता धरणी न पुरे ||
या नृत्याला झांजा व ढोलके यांची साथ असते. कित्येकदा टिपऱ्यांच्या
नाचाबरोबर नर्तक गोफही विणतात. टिपऱ्यांच्याहा खेळ रासक्रीडेतलाच एक प्रकार आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/टिपऱ्या" पासून हुडकले