"मासिक पाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

४,२६७ बाइट्सची भर घातली ,  ३ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
ओव्यूयालेशनचे वेळी काही स्त्रियांना ओटीपोटाच्या खालच्या एका बाजूस वेदना जाणवते, तिला मधली वेदना (शब्दाश:, मिडल पेन) म्हणतात. ही वेदना काही मिनिटांपासून काही तासांपर्यंत टिकते. ज्या बीजांडकोशातून अंडे बाहेर आलेले असते त्याच बाजूस दुखते मात्र ह्या दुखण्याचे कारण माहीत नाही. फॉलिकल फाटण्याआधी किंवा नंतर हे दुखणे जाणवते परंतु सर्वच आवर्तनांमध्ये दुखते असे नाही. दोन्ही बीजांडकोशांमधून आळीपाळीने अंडे बाहेर येईल असे नाही, ह्यासंबंधी काही ही नियम नाही. एक बीजांडकोश काढून टाकला तर राहिलेल्या बीजांडकोशातून दर महिन्यास एक अंडे बाहेर सोडले जाते.
 
'''ल्युटिल टप्पा'''
ओव्ह्यूलेशननंतर हा टप्पा सुरू होतो आणि, फलन न झाल्यास, सुमारे 14 दिवस चालून पुढील मासिक पाळीच्या आधी संपतो. ह्यामध्ये अंडे बाहेर सोडल्यानंतर फाटलेले फॉलिकल पुनः सांधले जाते आणि त्यातून बनलेल्या आकृतीस कॉर्पस ल्युटेअम असे म्हणतात. ह्यामधून वाढत्या प्रमाणात प्रोजेस्टेरॉन तयार केले जाते. फलन झालेच तर त्या दृष्टीने गर्भाशयाची तयारी करण्याचे काम ह्या कॉर्पस ल्युटेअमतर्फे केले जाते. कॉर्पस ल्युटेअमद्वारे तयार झालेल्या प्रोजेस्टेरॉनमुळे एंडोमेट्रियमची जाडी वाढते व भावी गर्भास आवश्यक ती पोषकद्रव्ये त्यात भरली जातात. तसेच प्रोजेस्टेरॉनमुळे सर्व्हिक्स (ग्रीवा) मधील म्युकस (श्लेष्मा) घट्ट होऊन गर्भाशयात वीर्य किंवा इतर जीवाणूंच्या प्रवेशाची शक्यता कमी होते. प्रोजेस्टेरॉनमुळे ह्या टप्प्यादरम्यान शरीराचे एकंदर तापमानही किंचित वाढते व पुढील मासिक पाळी चालू होईपर्यंत ते तसेच वाढलेले राहते. ह्या वाढीव तापमानावरूनही ओव्ह्यूढलेशनची शक्यता आजमावता येते. ह्या टप्प्यामध्ये इस्ट्रोजेनचे प्रमाण जास्त असते. एंडोमेट्रियम जाड बनवण्यामध्ये इस्ट्रोजेनचाही वाटा असतो.
 
इस्ट्रोजेन तसेच प्रोजेस्टेरॉनच्या वाढत्या पातळीमुळे स्तनांतील दुग्धनलिका रुंदावतात व ह्यामुळे स्तनांना सूज येऊन ते नाजुक बनतात.
 
अंड्याचे फलन न झाल्यास 14 दिवसांनंतर कॉर्पस ल्युटेअम खराब होते व पुढील मासिक आवर्तन सुरू होते. अंड्याचे फलन झाल्यास गर्भाभोवतीच्या पेशी ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिन नावाचे संप्रेरक तयार करतात. ह्या संप्रेरकाद्वारे कॉर्पस ल्युटेअम जतन केले जाते कारण त्यामधून अजूनही बाहेर पडणारे प्रोजेस्टेरॉन, वाढत्या गर्भाने स्वतःची संप्रेरके तयार करेपर्यंत, उपयोगी पडणार असते. गर्भधारणेची चाचणी (प्रेग्नन्सी टेस्ट) मुख्यतः ह्या ह्यूमन कोरियॉनिक गोनाडोट्रॉपिनचे वाढते प्रमाण शोधण्यावर आधारित असते.
==कालावधी==
वय वर्षे वीसच्या टप्प्यातील मुली आणि रजोनिवृतीपूपुर्व काळातील स्त्रिया त्यांच्या दृष्टीने ‘नियमित’ ही तुलनात्मक संज्ञा आहे. काही स्त्रियांच्या बाबतीत मासिक पाळी ही कधीच नियमित नसते. पहिल्या पाळीच्या अनुषंगाने पुढची पाळी कधी येईल याचा अंदाज वर्तविणे कधीकधी शक्य नसते. जास्त ताण पडणे, आजारपण, संतती नियमनांच्या गोळ्यांचा वापर अथवा त्यासाठी काही हार्मोन्सचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाळी अनियमित येणे शक्य असते. [[संततिनियमन|संततिनियमनासाठी]] तथाकथित “तालबद्ध प्रक्रिया" (र्‍हिदम मेथड) ही एक असुरक्षित पद्धत समजली जाते.
३,१२८

संपादने