"वडोदरा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
ओळ ३६:
 
मुंबई ते दिल्ली दरम्यान धावणारा [[राष्ट्रीय महामार्ग ८]] वडोदऱ्यामधून जातो. वडोदरा ते [[अहमदाबाद]] दरम्यानचा ९३ किमी लांबीचा [[राष्ट्रीय द्रुतगतीमार्ग १]] हा [[नियंत्रित-प्रवेश महामार्ग]] भारतामधील [राष्ट्रीय महामार्ग]] जाळ्यातील पहिलाच द्रुतगतीमार्ग आहे. ह्या मार्गामुळे वडोदरा व अहमदाबादेदरम्यान एका तासात प्रवास शक्य आहे.
 
==बडोद्यात झालेली मराठी साहित्य संमेलने==
===बडोद्यातले पहिले संमेलन===
२००९ सालच्या आॅक्टोबरमध्ये बडोद्यात पहिल्यांदा मराठी साहित्य संमेलन भरले होते. बडोदे न्यायमंदिरासमोरच्या मोकळ्या मैदानात झालेल्या या सातव्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेफ्टनंट कर्नल डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तीकर होते. स्वागताध्यक्ष बॅरिस्टर संपतराव गायकवाड तर उद्घाटक सयाजीराव गायकवाड होते.
 
याच संमेलनापासून मूळ ' मराठी ग्रंथकारांचे संमेलन' हे नाव बदलून 'महाराष्ट्र साहित्य संमेलन', असे व्यापक नाव देण्यात आले. तत्कालीन महाराष्ट्राबाहेर आयोजित करण्यात आलेले हे पहिलेच संमेलन होते. या संमेलनाच्या वेळी झालेल्या साहित्य दिंडीत लहान मुलेही सहभागी झाली होती.
 
===बडोद्याचे दुसरे साहित्य संमेलन===
१९२१ सालच्या नोव्हेंबरमध्ये बडोद्यात दुसरे मराठी साहित्य संमेलन झाले. ते साहित्यसम्राट न. चिं. केळकर यांच्या अध्यक्षतेखाली राजमहालाच्या प्रांगणात भरले होते. न. चिं. केळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर वाद निर्माण झाला.
 
त्यावेळी केसरीचे संपादक असलेल्या केळकरांनी कोल्हापूरचे शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक यांच्यातल्या वादासंदर्भात २१ सालच्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात शाहू महाराजांच्या विरोधात लेखन केलले होते, त्यामुळे संतापलेल्या काही लोकांनी शाहू महाराज हे सयाजीराव महाराजांचे व्याही असल्याचे कारण पुढे करत केळकर यांची निवड रद्द करण्याची मागणी केली होती.
 
केळकरांनी स्वतःहून राजीनामा द्यावा असाही प्रस्ताव देण्यात आला. पण स्वागताध्यक्ष संपतराव गायकवाड यांनी ठाम भूमिका घेतली आणि ही मागणी तसेच हा प्रस्ताव फेटाळून लावला.
 
या मराठी संमेलनाच्या साहित्य दिंडीत लेझीम पथक, मल्लखांब आणि लष्करी परेड होती. या परेडमध्ये पायदळ, घोडदळ आणि तोफखाना यांचा समावेश होता.
 
न. चिं. केळकर यांनी त्या वर्षी अध्यक्षपदावरून बोलताना अडीच तास भाषण केले. भाषण सुरू असताना कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्तीनं उठून जायचे नाही, अशी अट त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच घातली होती.
 
===बडोद्यातले ३रे साहित्य संमेलन===
१९३४ साली बडोद्यात तिसरे संमेलन झाले. हे २०वे अखिल भारतीय मराढी साित्य संमेलन होते. ना. गो. चापेकर संमेलनाध्यक्ष होते, तर नानासाहेब शिंदे स्वागताध्यक्ष.
 
न्यायमंदिर हॉलमध्ये झालेल्या या संमेलनातही लष्करी परेड झाली.
 
या संमेलनाला वि. स. खांडेकर, कवी अनिल, वामन मल्हार जोशी आदी उपस्थित होते. कवी माधव ज्युलियन संमलनाचे अध्यक्ष होते. त्या वर्षी उत्कृष्ट कवितेसाठीचं सुर्वणपदक बा. भ. बोरकर यांना मिळाले होते. त्यांनी त्यावेळी तेथे कर माझे जुळती आणि मुशाफिर या कविता सादर केल्या होत्या.
 
===बडोद्यात झालेले ४थे मराठी साहित्य संमेलन===
 
 
(अपूर्ण)
 
==हेही पहा==
"https://mr.wikipedia.org/wiki/वडोदरा" पासून हुडकले