"दागिने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Earring-art.jpg|thumb|right|कानांतल्या वलयांवरील कारागिरी]]
'''दागिने''' म्हणजे स्त्रियांचे सर्वात प्रिय आणि मौलिक अलंकार. अर्थात, पुरुषांचे आणि मुलांचेही काही खास दागिने असतात. दागिने हे सर्वसाधारणतः विशेष दुर्मिळदुर्मीळ (आणि अर्थात किंमती) धातूंपासून केलेले असतात आणि त्यांत बरेचदा विविध सुंदर [[हिरा|हिरे]] बसवलेले असतांत.
==घडण==
सूचनेनुसार एखादा तसाच्या तसा दागिना तयार करायला खूप कौशल्य लागते. हे काम हाताने करावे लागते. टिकल्या पाडणे, तार तयार करणे, जोडकाम करणे, तासकाम करणे अशा वेगवेगळ्या टप्प्यांमधून [[धातू]] जातो आणि मग दागिना घडतो. काही दागिने [[साचा|साच्यातून]] [[दाब]] देऊन बनवले जातात. सोन्याच्या पत्र्यावर [[ठसा]] उमटवूनही दागिने घडवले जातात. त्यावर जोडकाम, तासकाम आणि चमक आणणे यासारख्या प्रक्रिया हाताने केल्या जातात. दागिने घडवताना [[सोने|सोन्याचा]] वापर अधिक होतो. तसेच बांगड्या, अंगठ्या हे प्रकार [[मूस|मुशीत]] धातू ओतूनही तयार केले जातात. [[धातू]]वर नक्षीकाम तयार करणे ही एक [[कला]] आहे. यासाठी पूर्वी पारंपारिकरित्यापारंपरिकरित्या प्रशिक्षित कारागीर असत. परंतु नवीन तंत्रज्ञानुसार आता हे काम [[संगणक|संगणकावरही]] केले जाते. त्यासाठी [[कॅड]] (CAD) [[कॉम्प्युटरएडेड डिझायनिंग]] या [[संगणक]] [[प्रणाली]]द्वारा दागिन्यांच्या नक्षीचे काम केले जाते. ही बनवलेली नक्षी [[कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्‍चरिंग]] मशिनमध्ये फीड करून त्यातून एक प्रतिकृती बनवली जाते. ही काहीवेळा [[मेण|मेणातही]] बनवली जाते. त्यात योग्य त्या सुधारणा करून मग दागिना घडवला जातो.
==प्रकार==
दागिन्यांमध्ये अनेक प्रकार आहेत.
* बोटातले दागिने=[[अंगठी]], नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी,दशांगुळे इत्यादी
* केसात घालायचे दागिने=[[आकडा]], सुवर्णफूल,मूद,बिंदी,अग्र्फूलअग्रफुल,चांदीची /सोन्याची वेणी,तुरा,केसात घालायची सुवर्णफुले किंवा रत्‍नफुले, रविफूल, सूर्यफूल, गुलाबफूल,सूर्य-चंद्र, वगैरे.
* गळ्यांतले दागिने= एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, कंठी, [[कंठीहार]], काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, [[चंद्रहार]], [[चपलाकंठी]],[[चपलाहार]] ,[[कोल्हापुरी साज ]] ,चाफेकळी माळ,[[चिंचपेटी]] ,चोकर, चितांग, चौसरा, [[जोंधळी पोत]], टीकमणी सर वज्रटिक(टिका), [[ठुशी]], [[डोरले]], डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, [[पुतळ्यांची माळ]], पोहेहार, बकुळहार, [[बोरमाळ]], [[मंगळसूत्र]], माळ, [[मोहनमाळ]], लड, लफ्फा, [[लक्ष्मीहार]], [[वज्रटीक]], शिरण, राणी हार,श्रीमंतहार, सर, सरी, [[साखळी]], साज, हरपर रेवडी हार, [[हार]] ,वाघनखे , फलकमाला (कवचासारखी दिसणारी मोठ्या आकाराची कॉलर)इत्यादी .
* मनगटातले दागिने=[[कंकण]], कंगन, कडे, [[गजरा]], [[गोठ]], तोडा, शिंदेशाही तोडा, [[पाटल्या|पाटली]], पिछोडी, पो(व)ची, [[बांगडी|बांगड्या]], बिलवर, इत्यादी
*दंडात घालायचे दागिने= वाकी,[[बाजूबंद]],[[नागफणी]]
ओळ १३:
* कर्णालंकार: [[कुंडल]], [[कुड्या|कुडी]],[[झुबे]] , [[डूल]], बाळी, भिकबाळी, बुगडी, [[काप]] , [[वेल]], सुवर्णफुले,चौकडा
*पायातील दागिने=चाळ,तोडर,नूपुर,[[पैंजण]],[[जोडवे]],[[मासोळ्या|मासोळी]],विरोली,मंजीर,वाळा,वेढणी
* नाकातले दागिने=[[चमकी]], [[नथ]], सुंकली ,मोरणी
* देवाचे दागिने = मोरपीस,फरा,[[मुकुट]] : गणपतीच्या कपाळावर डोक्याकडून खाली उतरलेला रत्‍नखचीत फरा असतो.माणूस जे दागिने घालतो त्यातील बरेचसे दागिने देवतेलाही घालण्याची प्रथा आहे.
* अन्य दागिने-कलगी,कांडवाळे,मौलमणी,वेढे,शिरपेच,शिरस्त्राण,साखळी
 
* ठुशी
 
==लहान मुलांचे दागिने==
"https://mr.wikipedia.org/wiki/दागिने" पासून हुडकले