"जाते" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ४:
==इतिहास==
पूर्वी ग्रामीण भागात वीज पोहोचली नव्हती.तेंव्हा ग्रामीण भागातील स्त्रिया सकाळी भल्या पाहटे जात्यावर धान्य दळत असत. आधुनिक काळात जात्याची जागा विजेवर चालणाऱ्या गिरणी(चक्की)ने जात्याची जागा घेतली आहे.तरी आजही ग्रामीण भागात "जाते" वापरले जाते व लोकप्रिय आहे.
जात्यावर कडधान्य हि भरडले जातात.सनपूर्व दोन हजार वर्षापासून जाते प्रचारात असावे, असे मानण्यास आधार आहे. सिंधुसंस्कृतीशी समकालीन आणि समान असलेल्या लोथलमधील उत्खननात जाते (वरची तळी) सापडली आहेत. तशाच तऱ्हेची तळी असलेली जाती नेवासे, तडकोड, वडगाव व सिरपूर तेथील उत्खननात मिळाली आहेत. नागार्जुन आणि तक्षशिला येथील उत्खननात जाती सापडली आहेत.
जात्यावर कडधान्य हि भरडले जातात.
नेवासे येथील उत्खननात तर अनेक जाती सापडल्या आहेत.
पिठाच्या गिरण्या सुरु होण्यापूर्वी आपल्या कुटुंब जीवनात जात्याला महत्वाचे स्थान होते. आजही खेड्यात पहाटेच्या प्रहरी जात्याची घरघर आवाज येतो, आणि त्या घरघरीबरोबरच दळणाऱ्या स्त्रीच्या मुखातून स्त्र्वणाऱ्या अमृतमधुर ओव्याही ऐकायला मिळतात. गाण्याने श्रम हलके होतात, म्हणून जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणतात.या ओव्या अनेक अनामिका स्त्रियांनी सहजपणे रचलेल्या असतात. त्यांत स्त्रीहृद्यातील अनेक भावभावनांचे कल्लोळ व्यक्त झालेले दिसतात.एखादी जबाबदारी स्वीकारली,कि ती पार पडण्यासाठी क्षमता आपोआप येते, हा भाव व्यक्त करण्यासाठी ‘जात्यावर बसल्यावर ओवी सुचते,’ अशी म्हण मराठीत प्रचारात आलेली आहे. जात्यावरच्या ओव्यातून जात्याविषयी कृतज्ञता अनेक प्रकारे व्यक्त झालेली आहे. जात्याला ईश्वर मानून एक लोक कवयित्री गाते –
जात्या तू ईश्वरा | तुंझ जेवण मला ठांव |
घास घालिते मनोभाव ||
थोरल मांझ जात | खुंटा त्याचा चकमकी |
आम्ही दळू या मायलेकी ||
थोरल मांझ जात | चवघी बायकांचं |
घर वडील नायकांच ||
गीताच्या छंदात दळण सरत आल्यावर मराठी स्त्री आपल्या भक्तीसंपन्न भावनेच्या स्पर्शाने ओलावलेली एखादी ओवी म्हणून असा उपसंहार करते.
 
== स्वरूप ==
"https://mr.wikipedia.org/wiki/जाते" पासून हुडकले