"आकाशकंदिल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
खूणपताका: अमराठी मजकूर
ओळ ४:
रंगीत पतंगाचा कागद, कंपास,पट्टी,पेन्सिल,कात्री,कटर,डिंक,इ.
==कृती==
१)आपल्या जाड कागदावर १० सेमी त्रिज्येचे गोल वर्तुळ काढा, वर्तुळाच्या परिघाचे त्रिज्येच्या मापाने ६ समान भाग करा. २)त्रिज्येच्या मापाने (१० सेमी )आपण काढलेल्या ६ बिन्दुवरून वर्तुळाबाहेर परस्परांना छेदणारे कंस टाकाआणि ६ हे बिंदू मिळवा, ३)हे बिंदू केंद्रबिंदू धरून आकुती ३ प्रमाणे परीघावर पाकळ्या तयार करा. ४)अशी ४ वर्तुळे तयार करून कापून घ्या. ५)सर्व वर्तुळाच्या आतील गोल पाकळ्यांवर कर्कटक अथवा टोकदार वस्तू हलक्या हाताने फिरवून घ्या म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या घडया योग्य ठिकाणी पडतील. या आकाशकंदिलाच्या सर्व घड्यांना गोलाई आहे. कंपास फिरवताना कागद फाटणारनाही याची काळजी घ्या. ६)वर्तुळाच्या मध्यभागी साजेसे नक्षीकाम काढून ते कापा,त्याला आतील बाजूस रंगीत पतंगाचा कागद चिटकवा. ७)आता ४ वर्तुळांची जोडणी करून घ्या,प्रत्येक वर्तुळाच्या २ पाकळ्या इतर वर्तुळाशी सामाईक असणार आहेत, ही जोडणी झाल्यावर आपला मुख्य गोलाई असलेला ढाचा /त्रिमिती आकार तयार होईल. ८)वरील बाजूस अडकवण्यासाठी दोरा आणि खालील बाजूस झुरमुळ्या चिकटवा.तुमची कल्पकता वापरून हा आकाशकंदील सजवा.
 
हा झाला आपला आकाशकंदील तयार.यात दिवा लावून घराबाहेर लावा.