"संवादिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १७:
 
==भारतात निर्मिति==
भारतीय संगीत हे मूलतः बैठकीचे असल्यामुळे खाली बसून वाजिवण्यासाठी या वाद्यामध्ये मूलभूत वदल झाले ते बंगालच्या कारागिरानी बनविलेल्या हातपेटीमुळे. कोलकोत्त्याच्या द्वारिका दास या फर्मने आधुिनक हातपेटीची प्रथम निर्मिति केली. त्यानंतर टी. एस् रामचंद्र अँंड को. यानी महाराष्ट्रात याची निर्मिति सुरु केली. त्यानंतर गुजरातमध्ये अहमदाबाद येथे गणपतराव बर्वे यानी त्याची निर्मिति केली. द्वितीय महायुद्धानंतर युरोपमधून आँर्गनची आयातही बंद झाली. मग भावनगर मध्ये आणि पालितानामध्ये पेट्यांसहित ध्वनिपट्ट्यांचीही निर्मिति सुरु झाली. महाराष्ट्र, गुजरात, बंगाल आणि पंजाब प्रांतात दर्जेदार हार्मोनियम बनिवल्या जाऊ लागल्या. . बेळगावातही झीलु सुतार आणि रामचंद्र हुदलीकर यानी उत्तम दर्जाच्या हार्मोनियम बनविल्या. २२ श्रुतियुक्त हार्मोनियम बनिवण्यात हुदलीकर यांचा अधिकार होता.
पाश्चात्य सुरावटींप्रमाणे बनलेली हार्मोनियम हिंदुस्तानी संगीतासाठी कधी उपयोगात आणली जाण्याची शक्यताच नव्हती. परंतु उ. अब्दुल करीमखाँ यांचे शिष्य बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यानी गंधार ट्यून्ङ हार्मोनियम बनवून हिंदुस्तानी गायकीला योग्य बनविली. गं. बा. आचरेकर यानी श्रुति हार्मोनियम बनविली. आज ङाँ. विद्याधर अोक यानीही २२ श्रुतींची मेलोङियम बनविली आहे.
 
==कर्नाटक संगीतामध्ये संवादिनी==
"https://mr.wikipedia.org/wiki/संवादिनी" पासून हुडकले