"निहाली भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
निहाली ही [[भारत|भारतात]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] [[बुलढाणा जिल्हा|बुलढाणा जिल्हातल्या]] [[जळगाव जामोद|जळगाव जामोद]] तालुक्यात बोलली जाणारी एक भाषा आहे. १९९१ च्या जनगणनेनुसार जवळपास २००० लोक ही भाषा बोलतात. निहाली भाषेचे वैशिष्ठ्य असे की ती जगातल्या इतर कुठल्याही [[भाषाकुळ|भाषाकुळात]] न मोडणारी अशी स्वतंत्र भाषा आहे. यामुळे ती जगातल्या सर्वात प्राचीन भाषांपैकी एक असण्याचा संभव आहे. [[स्पेन|स्पेनमधील]] [[बास्क भाषा]] निहालीप्रमाणेच स्वतंत्र भाषा आहे.
 
निहाली भाषा सुरुवातीला ऐकण्यास थोडी क्लिष्ट, किचकट वाटत असली तरी ती लवकर आत्मसात होऊ शकते.
 
== निहाली भाषेतील काही शब्द ==
* पाकीण (मोर)
* घोटारी (हरीण)
* चोगम (रानडुक्कर)
* बोल्ग (अस्वल)
* टेमऱ्या (वाघ)
* चारको (माकड)
* बोटोर (ससा)
* कोगो (साप)
* बादरा (आकाश)
* खारा (जमीन)
* मांडो (पाऊस)
* खोश (हवा)
* आड्डो (झाड)
* सिडू (दारू)
* कोंबा (कोंबडा)
 
== निहाली भाषेतील काही संवाद ==
* 'बोइस्कोल का' (शाळेत चल)
* 'मी गाचल्ले' (कुठे चालले?)
* 'प्या हिंगा की' (इकडे ये)
* 'न जुमो नान' (तुझे नाव काय?)
* 'ऐंगे जुमो तोमाराम निहाल' (माझे नाव तोताराम निहाल आहे)
* 'ने छोकरा टे की बेटे' (तुम्ही जेवण केले की नाही?)
* 'ओलान नांजी डां' (भाजी काय होती?)
* 'ने पिवर मानस' (तुम्ही चांगले माणूस आहात)
* 'बो निंडो का (निंदायला चला)
* 'जप्पा डेलन की नान (पाणी पिता का?)
 
[[वर्ग:भारतामधील भाषा]]