"बँक मेळपत्रक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३,४६१ बाइट्सची भर घातली ,  ४ वर्षांपूर्वी
 
==बँक मेळपत्रक तयार करण्याची पद्धत ==
 
बँक मेळपत्रक बनवणे ही एका व्यवसायाची गरज असते.
 
१) मेळपत्रक बनवण्याची सुरुवात रोख पुस्तक किंवा बँक खाते पुस्तकातील शिल्लक रक्कम घेऊन शेवट दुसरी शिल्लक कशी आली तो शोधण्यामध्ये होतो.त्यामुळे एक कुठली तरी शिल्लक मेळपत्रकासाठी घ्यावी. उदाहरणासाठी आपण रोख पुस्तकातील शिल्लक रकमेने सुरुवात करू.
 
२) समजा रोख पुस्तकातील रक्कम एखाद्या व्यवहारामुळे वाढत असेल तर त्या व्यवहारासमोर + चिन्ह करतात. आपण दिलेला धनादेश बँकेत अजून वटवला गेला नाही म्हणजेच रोख पुस्तकातील शिल्लक वाढेल. किंवा बँक खात्यामध्ये मुदत ठेवीची रक्कम जमा झाली तर रोख पुस्तकातील शिलकीत ती वाढवावी लागेल.
 
३) त्याच प्रमाणे रोख पुस्तकातील शिल्लक कमी करणाऱ्या व्यवहारांसमोर - (वजा ) चिन्ह करतात. कर्जाचा हप्ता बँक खात्यातून वळता केला गेला. याची नोंद रोख पुस्तकात करून शिल्लक कमी करावी लागेल.
 
४) अशा प्रकारे एका पुस्तकात दिसणाऱ्या पण दुसरीकडे न दिसणाऱ्या सर्व व्यवहारांची मोजणी करून बँक खाते पुस्तकाची शिल्लक कशी आली हे समजू शकते.
 
५) रोख पुस्तका प्रमाणे बँक खात्याच्या नावे असणारी शिल्लक बँकेत मात्र ग्राहकाच्या खात्यावर जमा शिल्लक म्हणून दाखवली जाते. त्याच प्रमाणे व्यापाऱ्याने बँकेतून उचल (ओव्हरड्राफ्ट) घेतली असेल व्यापाऱ्याच्या रोख खात्यामध्ये बँकेची शिल्लक जमा दिसते म्हणजेच त्या धंद्याच्या दृष्टीने बँक ही [[धनको]] बनते. थोडक्यात आपण बँकेच्या पुस्तकाप्रमाणे की व्यापाऱ्याच्या पुस्तकाप्रमाणे शिल्लक बघतो आहोत यावर शिल्लक रकमेचा अर्थ लावावा लागतो.
 
==प्रारूप==
५९०

संपादने