"सुभाषचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६४:
[[महात्मा गांधी|गांधींजीनी]] देखिल [[कोलकाता|कोलकत्याला]] जाऊन [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंबरोबर]] काम करण्याचा सल्ला दिला. मग सुभाषबाबू [[कोलकाता|कोलकात्त्याला]] आले व [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंना]] भेटले. [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंना]] त्यांना पाहून फार आनंद झाला. त्याकाळी, [[महात्मा गांधी|गांधींजीनी]] इंग्रज सरकारच्या विरोधात [[असहकार आंदोलन]] चालवले होते. [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबू]] [[बंगाल|बंगालमध्ये]] ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले.
 
[[इ.स. १९२२|१९२२]] साली [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबूंनी]] काँग्रेस अंतर्गत [[स्वराज पक्ष|स्वराज पक्षाची]] स्थापना केली. [[विधानसभा|विधानसभेच्या]] आतून इंग्रज सरकारला विरोध करण्यासाठी, [[कोलकाता]] महापालिकेची निवडणूक, [[स्वराज पक्ष|स्वराज पक्षाने]] लढवून, जिंकली. स्वतः [[देशबंधू चित्तरंजन दास|दासबाबू]] [[कोलकाता|कोलकात्त्याचे]] महापौर झाले. त्यांनी सुभाषबाबूंना महापालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बनवले. सुभाषबाबूंनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. [[कोलकाता|कोलकात्त्यातील]] रस्त्यांची इंग्रज नावे बदलून, त्यांना [[भारत|भारतीय]] नावे दिली गेली. स्वातंत्र्यलढ्यात प्राणार्पण केलेल्या क्रांतिकारकांच्या कुटुं्बीयांनाकुटुंबीयांना महापालिकेत नोकरी मिळू लागली.
 
लवकरच, सुभाषबाबू देशातील एक अग्रेसर युवा नेता म्हणून ओळखले जाऊ लागले. [[पंडित जवाहरलाल नेहरू|पंडित जवाहरलाल नेहरूंसह]], सुभाषबाबूंनी काँग्रेस अंतर्गत [[इंडिपेंडन्स लिग|इंडिपेंडन्स लिगची]] स्थापना केली. [[इ.स. १९२८|१९२८]] साली जेव्हा [[सायमन कमिशन]] [[भारत|भारतात]] आले, तेव्हा काँग्रेसने त्याला काळे झेंडे दाखवले होते. [[कोलकाता|कोलकात्त्यात]] सुभाषबाबूंनी ह्या आंदोलनाचे नेतृत्व केले. [[सायमन कमिशन|सायमन कमिशनला]] उत्तर देण्यासाठी, काँग्रेसने [[भारत|भारताच्या]] भावी घटनेचा आराखडा तयार करण्यासाठी आठ सदस्यांची समिती नेमली. [[मोतीलाल नेहरू|पंडित मोतीलाल नेहरू]] ह्या समितीचे अध्यक्ष होते तर सुभाषबाबू त्याचे एक सदस्य. ह्या समितीने [[नेहरू रिपोर्ट]] सादर केला.