"सुसान लँगर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''सुसान लँगर''' ह्यांचा जन्म २० डिसेंबर १८९५ रोजी झाला. आणि त्यांचा मृत्यू १७ जुलै १९८५ रोजी झाला. त्या अमेरिकन तत्त्वज्ञ लेखिका होत्या.त्यांनी भाषिक विश्लेषण व सौंदर्यशास्त्र या विषयांत मौलिक विचारांची भर घातली होती.त्यांचा जन्म न्यूयॉर्क शहरातला होता. .त्यांचं बी.ए च शिक्षण रॅडक्लिफ कॉलेजमध्ये १९२० साली झाले आणि हार्व्हर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञानामध्ये त्यांची  पीएच्.डी १९२६ साली झाली.त्या १९२७ ते १९४२ साली  रॅडक्लिफ कॉलेजमध्ये तत्त्वज्ञान विषयाच्या पाठनिर्देशिका होत्या.आणि १९४५ ते १९५० साली कोलंबिया विद्यापीठात तत्त्वज्ञानाच्या अधिव्याख्यात्या होत्या.ते १९५४ ते १९६१ तसेय कनेक्टिकट कॉलेजात तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या आणि १९६१ साली  नंतर  ते गुणश्री प्राध्यापिका होत्या. १९६२ साली मध्ये ते  सेवानिवृत्ती होत्या.त्यांचा विवाह १९२१ मध्ये विल्यम एल्. लँगर या इतिहासकाराशी झाला   आणि १९४२ मध्ये त्यांचा  घटस्फोट झाला . आणि  ओल्ड लाइम, कनेक्टिकट येथे  त्यांचे निधन झाले .फिलॉसफी इन अ न्यू की (१९४२), फीलिंग अँड फॉर्म (१९५३), प्रॉब्लेम्स ऑफ आर्ट (१९५०) ही त्यांची महत्त्वाची पुस्तके आहेत.ब्रिटिश तत्त्वज्ञ ॲल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड व जर्मन तत्त्वज्ञ एर्न्स्ट कासीरर यांचा त्यांच्यावर प्रभाव होता.माइंड : ॲन एसे ऑन ह्यूमन फीलिंग, तीन खंड (१९६७, १९७२ व १९८२) या ग्रंथात मानवी मनाचा उगम व विकास यासंबंधीचे विवेचन आहे.लँगर यांचे तत्त्वज्ञानात्मक लिखाण मुख्यतः प्रतीकांविषयी (सिंबल्स) आहे.सुसान लँगर म्हणतात आपण आपले विचार मांडण्यासाठी किंवा भावना व्यक्त करण्यासाठी जी नेहमीची भाषा वापरतो, ती प्रतीकांची बनलेली असते.प्रतीक (सिंबल) आणि खूण (साइन) ह्यांत लँगर भेद करतात.ते म्हणतात जेथे धूर असतो तेथे विस्तव असतो असे मला वारंवार आढळून आले,तर माझ्यासाठी धूर ही विस्तवाची खूण बनते. येथे धूर आहे तेव्हा येथे विस्तव असला पाहिजे, असा तर्क मी करतो. पण ‘धूर’ हा शब्द आणि धूर ही वस्तू यांच्यामधील संबंध असा कार्यकारणात्मक किंवा भौतिक साहचर्याचा नाही.‘धूर’ हा शब्द धूर ह्या वस्तूचा वाचक आहे. ह्या दोहोंतील संबंध अर्थात्मक आहे, भौतिक किंवा नैसर्गिक नाही.‘धूर’ हा शब्द धूर ह्या वस्तूचे प्रतीक आहे; धूराविषयी बोलण्याचे, विचार करण्याचे माध्यम आहे. धूर प्रत्यक्षात उपस्थित नसतानाही धूराचा विचार ‘धूर’ शब्द वापरून करता येतो.आता, लँगर ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रतीके दोन प्रकारची असतात.एक प्रकार म्हणजे विवेचक (डिस्कर्सिव्ह) प्रतीके.वस्तू, घटना ह्यांचे वर्णन करण्यासाठी आपण जी नेहमीची गद्य भाषा वापरतो ती विवेचक प्रतीकांची बनलेली असते आणि तिची परिणती वैज्ञानिक भाषा आणि गणिताची भाषा ह्यांच्यात झालेली असते.वस्तुस्थितीचे तिचे घटक आणि त्यांच्यामधील परस्परसंबंध ह्यांच्यात आपण विश्लेषण करतो.प्रत्येक घटक किंवा संबंध ह्यांचे वाचक असलेले असे एक प्रतीक-शब्द-भाषेत असते आणि ह्या प्रतीकांची किंवा शब्दांची व्याकरणाच्या नियमानुसार रचना केल्याने जे वाक्य बनते, ते सबंध वस्तुस्थितीचे वर्णन करते. ह्यामुळे त्याच प्रतीकांची वेगवेगळ्या प्रकारे रचना करून भिन्न वस्तुस्थितींचे वर्णने करता येतात.
 
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]