"नलिनीबाला देवी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अभिनंदन! १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला ! दृश्य संपादन
No edit summary
ओळ १:
'''नलिनीबाला देवी''' या असमिया कवयित्री होत्या. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बरपेटा ह्या गावी त्यांचा जन्म २३ मार्च १८१८ रोजी झाला. आसाममधील कामरूप जिल्ह्यातील बरपेटा ह्या गावी त्यांचा जन्म २३ मार्च १८१८ रोजी झाला.भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील प्रमुख असमिया नेते नवीनचंद्र बर्दोलोई हे त्यांचे वडील होते . नलिनीबाला देवीं यांचे  शिक्षण घरीच खाजगी रीत्या झाले.संधियार सूर (१९२८, म. शी. संध्यासंगीत)   हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होता .त्यानंतर सपोनार सूर (१९४७, म. शी. स्वप्नसंगीत), स्मृतितीर्थ (१९४८), पारसमणि (१९५७), अलकनंदा (१९५७) असे त्यांचे अन्य उल्लेखनीय काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले.

नलिनीबाला देवींना दुर्दैवाने अकाली वैधव्य आले, त्याची छाया त्यांच्या जीवनावर कायमची पडली.गीता, उपनिषदे, आसाममधील वैष्णव संतांचे साहित्य ह्यांच्या वाचनातून मानसिक समाधान मिळविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांच्या जीवनातील व्यथा-वेदनांचा खोल ठसा नलिनीबाला देवीं यांच्या  कवितेवर उमटलेला आहे. आत्म्याचे परमात्म्याशी मीलन घडवून आणण्याची तीव्र इच्छा, गूढगुंजनाची ओढ आणि निसर्गातील यच्चयावत वस्तूंमधील चिरंतन सौंदर्याची जाणीव त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येते. रवींद्रनाथ टागोरांची कविता आणि साहित्य ह्यांकडेही त्या ओढल्या गेल्या. ह्या सर्वांचा प्रभाव त्यांच्या कवितेवर जाणवतो.काही उत्कट देशभक्तिपर कविताही त्यांनी लिहिलेल्या आहेत.