"अप्पा जळगांवकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
अप्पासाहेब जळगावकर हे एक प्रसिद्ध हार्मोनियमवादक होते. त्यांनी अनेक कलाकारांच्या [[गायन|गायनात]] [[संवादिनी|संवादिनीची]] संगत केली आहे. हे 'आप्पा' या टोपण नावाने ओळखले जात.
 
आप्पा [[जळगांवकर]] ऊर्फ सखाराम प्रभाकर जळगावकर (जन्म : जळगाव-जालना, १ जानेवारी १९२२; मृत्यू : पुणे, १६ सप्टेंबर २००९) हे हार्मोनिअमवर लीलया फिरणार्‍या बोटांनी स्वरास्वरांतून सुगंध भरणारे हार्मोनियमवादक होते.
 
आप्पा एक वर्षाचे असतानाच मातापित्यांचे छत्र हरपल्याने त्याच गावातील प्रभाकरबुवा यांनी त्यांना दत्तक घेतले व त्यांचा सांभाळ केला. कौटुंबिक जीवन त्यांना फारसे मिळाले नाही. स्थानिक मठात त्यांना आसरा मिळाला. सतत कष्ट, संघर्ष यांचा सामना करत त्यांनी आपली संगीताची आवड जोपासली. बाळकृष्णबुवा चिखलीकर, उस्ताद शब्बू खाँ यांच्याकडून त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. प्रथम त्यांना क्‍लॅरोनेट तसेच व्हायोलिनवादनात रुची होती. नंतर मात्र हार्मोनिअम (म्हणजे बाजाची पेटी किंवा संवादिनी) हेच त्यांचे सर्वस्व बनले.