"अभिज्ञानशाकुन्तलम्" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छोNo edit summary
खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? दृश्य संपादन
ओळ १:
अभिज्ञान्शाकुन्तालम हे महाकवी [[कालिदास|कालिदासाचे]] [[महाभारत|महाभारतातील]] [[शकुंतला|शकुन्त्लोपाख्यान]] यावर आधारित आहे. या नाटकामध्ये एकूण सात अंक असून चौथा अंक ही पूर्णपणे [[कालिदास|कालिदासाची]] निर्मिती आहे. या नाटकाच्या मंगलाचरणामध्ये [[शिव|शंकराचे]] वर्णन केले आहे. [[दुष्यंत]] हा या [[नाटक|नाटकाचा]] नायक असून [[शकुंतला]] ही या नाटकाची नायिका आहे. [[विश्वामित्र]] आणि [[मेनका]] यांची [[शकुंतला]] ही कन्या असली तरी तिचे पालनपोषण [[कण्व]] मुनींनी केले. हे नाटक म्हणजे [[दुष्यंत]] आणि [[शकुंतला]] यांची प्रणयकथा आहे. [[शृंगाररस]] हा या [[नाटक|नाटकतील]] प्रधानरस असून करुण,अद्भूत,हास्य,इ. हे यातील दुय्यम रस आहेत.
 
[[शिकार|शिकारीसाठी]] [[दुष्यंत]] गेला असता [[कण्व|कण्व मुनींचा]] आश्रम जवळ असल्याने तो तेथे गेला असता [[शकुंतला|शकुंतलेची]] भेट होते.त्यानंतर त्यांच्या मनात [[प्रेम]] निर्माण होते. [[प्रेम]] व्यक्त केल्यावर त्यांच्यात गांधर्व [[विवाह]] होतो. 'सैन्य घेऊन मी तुला न्यायला येईन' असे सांगून आपल्या राज्यात निघून जातो. यानंतर [[दुर्वास]] मुनींच्या शापाने [[दुष्यंत|दुष्यंताला]] झालेले [[लग्न|विवाहाचे]] विस्मरण आणि त्यामुळे [[शकुंतला|शकुंतलेच्या]] दुख;चेदुःखाचे वर्णन पाचव्या आणि सहाव्या अंकात आहे. शेवटच्या अंकात [[सर्वदमन]] या [[दुष्यंत]] [[शकुंतला|शकुंतलेच्या]] [[पुत्र|पुत्राच्या]] मदतीने त्यांचे पुनर्मिलन झालेले दिसून येते. अशाप्रकारे या नाटकाची कथा सांगता येईल.
 
अंगठीच्या मदतीने [[दुष्यंत|दुष्यंताला]] [[शकुंतला|शकुंतलेचे]] झालेले स्मरण [[नाटक|नाटकाच्या]] शीर्षकातून दिसून येत असल्याने शीर्षक यथार्थ आहे.
 
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]