"जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी कायदा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
ओळ २:
 
==महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम १९९८==
कायद्याच्या चौकटीतून विचार केल्यास विवाहाची नोंदणी होत नाही, तोपर्यंत तो विवाह कायदेशीर मानला जात नाही. प्रत्येकाच्या चालीरितीनुसार अनेक विवाह होत असले, तरी या विवाहांची प्रत्यक्ष नोंद होण्याचे प्रमाण तुलनेने कमी आहे; मात्र सध्या याबाबत जागरूकता वाढते आहे. महाराष्ट्र विवाह नोंदणी अधिनियम, १९९८ यानुसार ही नोंदणी करण्यात येते. शहरी भागांत विवाह निबंधक आणि ग्रामीण भागांत ग्रामसेवक ही नोंदणी करतात. विवाह नोंदणी सक्तीची करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी दिली आहे. ही नोंदणी करणे आवश्‍यक आहे; पण अनिवार्य नाही. त्यामुळेच विवाह होऊनही नोंदणी न केलेली अनेक जोडपी सापडतील. विवाह नोंदणीचे महत्त्व माहीत नसणे, नोंदणी करण्याबद्दल अपुरी माहिती, काही गैरसमज अशी काही कारणे ही नोंदणी न करण्यामागे असतात.जर वधू व वर हिंदू धर्माचे असतील तर तो विवाह " हिंदू मॅरीऐज अॅक्ट " या कायद्या अंतर्गत होतो. जरा वधू व वर वेगवेगळ्या धर्माचे असतील तर त्यांचा विवाह हा " स्पेशल मॅरीऐज अॅक्ट" या कायद्या आंतर्गत होतो.
 
==विवाह नोंदणीचे प्रकार==