"मासिक पाळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
धार्मिक भाग काढून टाकला
ओळ १८:
 
पाळी पुढे करायची [[औषधे]] घेण्याचे परिणाम स्त्रिया आणि मुली यांना समजावून देणे आवश्यक आहे.
 
==विटाळ संकल्पना आणि धार्मिक दृष्टिकोन ==
प्राचीन [[धर्म]]शास्त्रकारांनी स्त्रीला या चार दिवसात धार्मिक कृत्यात सहभागी होण्यास मनाई केली होती. तसेच घरातील दैनंदिन कामापासूनही तिने दूर रहावे असे सुचविले होते. कृत्यकल्पतरु या ग्रंथात मासिक पाळी स्त्रीला अस्पर्श बनवते, अशी चुकीची माहिती आहे. शिक्षापत्री या ग्रंथात मासिक पाळीच्या काळात स्त्रीला रज:स्वला असे संबोधिले आहे आणि या काळाला ‘मासिक व्रत’ असे म्हटले आहे.या ग्रंथांनी ,मासिक पाळीच्या चौथ्या दिवशी डोक्यावरून अंघोळ केल्यानंतरच स्त्री घरातील कामात भाग घेऊ शकते तसेच देव आणि पितृकार्यात सहभागी होवू शकते असे नियम सांगितले होते. हे नियय अशास्त्रीय व कालबाह्य झाले असल्याने आधुनिक स्त्रिया पाळत नाहीत. .<ref>कृत्य कल्पतरू-भट्ट लक्ष्मीधर </ref>
 
मध्ययुगात स्त्रीची पाळी चालू झाली असेल तर तिला ‘बाहेरची आहे‘ असे संबोधले जायचे. सामाजिक सुधारणांमुळे रजस्वला स्त्रीला वेगळे बसवले जाण्याचे प्रमाण कमी झालेले आहे असे दिसते. आता महिलाही सर्व व्यवहार करत असल्याने बाजूला बसणे/बसवणे सहज शक्य नाही. पण तरीही घरातली एखादी श्रावणातील पूजा, गणपती, लग्न, मुंज यांसारख्या कार्यांच्या वेळी मासिक पाळी येऊ नये, यासाठी प्रयत्न असतो. कारण ‘विटाळ‘ ही संकल्पना अजून काहींच्या मनात ठाण मांडून बसली आहे.
 
सुशिक्षित किंवा सुधारित कुटुंबे आपल्या लेकी-सुनांना [[पूजा]], लग्नकार्य अशा धार्मिक प्रसंगांत पाळी असताना सहभागी करून घेतातही. ज्ञानार्णवतन्त्र या ग्रंथात सांगितले आहे- ‘ज्याला धर्म आणि अधर्म याचे ज्ञान आहे , त्याच्या दृष्टीने विष्ठा, मूत्र, मासिक स्राव, नखे आणि हाडे ही प्रत्येक गोष्ट शुद्ध आहे. शरीरच मासिक पाळीचे रक्त तयार करते, त्यामधून कोणी मुक्तीपर्यंत पोचेल असा दोष का द्यावा?’<ref>ज्ञानार्णवतंत्र </ref>
 
मासिक पाळीचा स्राव ज्या वेळेस स्त्रीला होतो त्या वेळेस अनेकींना अशक्तपणा जाणवत असतो. पूर्वीच्या काळी घरात, स्वयंपाकात स्त्रियांना अतिशय श्रमाचे काम करावे लागायचे. अशा वेळी त्यांना सक्तीची विश्रांती मिळावी या प्रयोजनाने त्यांना सक्तीने कोपऱ्यात बसविले जाण्याची प्रथा सुरू झाली. दुसरे कारण म्हणजे होणारा रक्तस्राव. पूर्वीच्या काळी कापडी रक्तशोषक घड्या (सॅनिटरी नॅपकिन्स) वगैरेंचा शोध लागलेला नसल्याने, चिंध्या-फडकी ठेवून काम भागवले जायचे. तरीही जर अतिश्रमाने स्राव जास्त झाला आणि त्याच्या काही खुणा जर घरातील जमिनीवर आढळल्या तर सणासुदाला अथवा पूजेला जमणाऱ्या गर्दीत ते पटकन कुणाच्याही नजरेत येऊ शकेल, म्हणून कदाचित या स्त्रियांना वेगळे ठेवले गेल्याची शक्यता आहे.
 
==संतती नियमन==