"पंकजा मुंडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
निवास प्राचल
ओळ २०२:
* दुष्काळाताही मराठवाड्यातील दारू कारखान्यांचा पाणी पुरवठा अविरत रहावा हा पंकजा मुंडे यांचा आदेश स्वार्थाने प्रेरित आहे अशी टीका होत आहे. पंकजा यांचे पती दारू कारखान्याचे मॅनेजर आहेत.
* पंकजा मुडे यांच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाची घरपोच आहार देण्याच्या योजनेसाठी काढलेली ६,३०० कोटी रुपयांची निविदा औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली. या योजनेसाठी स्थानिक महिला बचत गटांच्या ऐवजी व्यंकटेश्वर औद्योगिक उत्पादन संस्था (लातूर), महाराष्ट्र महिला सहकारी गृह उद्योगसंस्था (धुळे) आणि महालक्ष्मी महिला गृह उद्योग बाल विकास उद्देश संस्था (नांदेड) या वशिल्याच्या तीनच संस्थांना काम देण्याचा पंकजा मुंडे यांचा मूळ बेत होता.(११-७-२०१६)
* पंकजा मुडे यांनी ‘जलयुक्त शिवार’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेच्या यशाचे(?) सर्व श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्‍न केला. हे न आवडल्याने मुख्यंत्र्यांनी त्यांच्याकडून जलसंवर्धन आणि रोजगार हमी योजना या खात्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यांच्याकडे त्यानंतर, फक्त महिला आणि बाल कल्याण व ग्रामविकास हे एकच खाते उरले आहे.(११-७-२०१६)
* जलसंवर्धन खाते काढून घेतल्यावर बँकॉक येथे त्या विषयावर होणार्‍या जागतिक पाणी परिषदेला (कॉन्फरन्सला) न जाण्याच्या त्यांनी ट्‌विटरवर उपस्थित केलेल्या इराद्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कडक प्रत्युत्तर दिले. ट्‌विटरवरच्या दोघांच्या या जाहीर संवादाबद्दल केंद्र सरकारने आपली नाराजी व्यक्त केली.
* शेतकर्‍यांचे २ कोटी ४२ लाख रुपये थकविल्याबद्दल पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याचा गाळप परवाना रद्द झाला आहे. पंकजा मुंडे यांच्याशी संबंधित असलेल्या लातूर व जालना जिल्ह्यातील दोन साखर कारखान्यांचे गाळप परवानेही रद्द करण्यात आहेत. (१७-७-२०१६ची बातमी)