"भर्तृहरि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शीर्षक दिले
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
 
'''भर्तृहरीचा काळ आणि ग्रंथसंपदा'''
शतकत्रयांखेरीज, भर्तृहरीने ''वाक्पदीयम्‌'वाक्यपदीयम्' नावाचा व्याकरणावरील [[संस्कृत]] ग्रंथ लिहिलेला आहे.
वाक्यपदीय हा ग्रंथ लिहिणारा व्याकरणकार भर्तृहरी आणि शतकत्रयकर्ता भर्तृहरी असे एकाच नावाचे दोन ग्रंथकर्ते होऊन गेल्याचे दिसते. भारतात इ. स. च्या सातव्या शतकात आलेला चिनी प्रवासी इत्सिंग ह्याने भर्तृहरिनामक एका भारतीय विद्वानाचा उल्लेख आपल्या लेखनात केलेला आहे. हा भर्तृहरी बौद्ध धर्माचा पुरस्कर्ता होता आणि आपण भारतात येण्याच्या चाळीस वर्षे आधी ह्या भर्तृहरीचे निधन झाले होते, असे इत्सिंगने म्हटले आहे. इत्सिंगच्या ह्या लेखनाचा काळ इ. स. ६९१ हा असल्यामुळे त्याने उल्लेखिलेल्या ह्या भर्तृहरीचे निधन ६५१ मध्ये झाले असावे. वाक्यपदीय हा ग्रंथ ह्याच भर्तृहरीने लिहीला, असा स्पष्ट उल्लेख इत्सिंगने केलेला आहे. तथापि दिड़नागाच्या (४८०-५४०) त्रैकाल्यपरीक्षेच्या तिबेटी भाषांतरात भर्तृहरीचे काही श्लोक उदधृत केलेले असल्यामुळे चौथ्या शतकाचा शेवट किंवा पाचव्या शतकाची सुरुवात असा त्याचा काळ असावा, असे काही अभ्यासक मानतात. वाक्यपदीयकार भर्तृहरी आणि शतकत्रयकर्ता भर्तृहरी हे एकच असावेत किंवा काय, हे निश्चितपणे सांगता येत नाही. तथापि ते एक नसावेत, असे मानण्याकडे विद्वानांचा सर्वसाधारण कल आहे. शतकत्रयात व्याकरणाचे काही अपप्रयोग आलेले आहेत. ते लक्षात घेता, त्याचे कर्तृत्व महावैयाकरण असलेल्या वाक्यपदीयकार भर्तृहरीला देणे अवघड आहे. शिवाय, शतकत्रयातील काही उल्लेखांवरुन त्याचा कर्ता शैव-वेदान्ती असावा, असेही दिसते.
 
"https://mr.wikipedia.org/wiki/भर्तृहरि" पासून हुडकले