"विनोद खन्ना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २९:
}}
'''विनोद खन्ना''' ([[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਵਿਨੋਦ ਖੰਨਾ ; [[रोमन लिपी]]: ''Vinod Khanna'') ([[६ ऑक्टोबर]] [[इ.स. १९४६]] - [[२७ एप्रिल]] [[इ.स. २०१७]]) हे [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपटसृष्टीतील]] अभिनेता, निर्माता व भारतीय राजकारणी होते. इ.स. १९६८ साली ''मन का मीत'' या हिंदी चित्रपटातील खलनायकी भूमिकेद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले; पण पुढे मात्र यांच्या नायकाच्या किंवा सहनायकी भूमिका लक्षवेधक ठरल्या. त्यांनी अभिनय केलेल्या एकूण १३७ चित्रपटांपैकी ''लहू के दो रंग'', ''कुर्बानी'', ''दयावान'', ''मेरा गांव मेरा देश'', ''कच्चे धागे'', ''अचानक'' (इ.स. १९७३), ''परवरिश'' (इ.स. १९७७), ''[[अमर अकबर अ‍ॅन्थनी]]'' (इ.स. १९७७), [[मुकद्दर का सिकंदर]] (इ.स. १९७८), [[द बर्निंग ट्रेन]] (इ.स. १९८०) हे चित्रपट विशेष गाजले.
 
==संन्यास आणि पुनरागमन==
 
विनोद खन्ना यांनी आपल्या कारकीर्दीच्या शिखरावर असताना चित्रपट सृष्टीतून अचानक निवृत्ती घेतली व आचार्य रजनीश यांचे शिष्यत्व पत्करले. साधारण ५ वर्षे ओशो रजनीश यांच्या आश्रमात संन्यास घेतल्यावर १९८७ मध्ये विनोद खन्ना यांनी पुनश्च चित्रपट सृष्टीत पुनरागमन केले.
डिम्पल कपाडिया यांच्या बरोबर इन्साफ चित्रपट करून त्यांचे पुनरागमन झाले. 'जुर्म' , 'चांदनी', 'दयावान 'असे काही अतिशय गाजलेले चित्रपट या दुसर्या सत्रात विनोद खन्ना यांनी गाजवले.
 
==राजकीय कारकीर्द==
 
विनोद खन्ना [[पंजाब|पंजाबातील]] [[गुरदासपुर (लोकसभा मतदारसंघ)|गुरुदासपूर मतदारसंघातून]] [[बारावी लोकसभा|बाराव्या]] (इ.स. १९९८), [[तेरावी लोकसभा|तेराव्या]] (इ.स. १९९९) व [[चौदावी लोकसभा|चौदाव्या लोकसभेत]] [[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाच्या]] उमेदवारीवर निवडून आले. जुलै, इ.स. २००२ मध्ये त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात सांस्कृतिक व पर्यटन मंत्री म्हणून, तर त्यानंतर काही महिन्यांनी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री म्हणून नियुक्ती मिळाली.