"अशोकाचे शिलालेख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो संतोष दहिवळ ने पुनर्निर्देशन ठेउन लेख अशोकाची आज्ञापत्रे वरुन अशोकाचे शिलालेख ला हलविला
ओळ ३७:
देवांनाप्रिय प्रियदर्शी राजा दानाने व विविध पुजनाने सर्व संप्रदायातील प्रवज्जित (गृहत्यागी) आणि (सद्)गृहस्थांचा सन्मान करतात. परंतु देवांनाप्रिय किर्ती व सारवृद्धीस (जसे) मानतात (तसे) दानास व पुजनास नव्हे. सारवृद्धी अनेक प्रकारे होते. यात मुख्य (म्हणजे) अल्पवाणी (बोलण्यावर संयम). (म्हणजे) काय ? तर विनाकारण स्वसंप्रदायाची पुजा व परसंप्रदायाची निन्दा न करावी वा अल्पशी (चर्चा) त्या त्या प्रकरणी व्हावी. वेळोवेळी परसंप्रदायाची पुजाच व्हावी. असे करणारा स्वसंप्रदायाची वृद्धी व परसंप्रदायास उपकृत करतो. याविपरित करणारा स्वसंप्रदायाची क्षति आणि परसंप्रदायास(ही) अपकार करतो. जो कुणी स्वसंप्रदायाच्या भक्तिस्तव स्वसंप्रदायास (अधिक) प्रकाशित करण्यासाठी स्वसंप्रदायाची पुजा व परसंप्रदायाची निन्दा करतो, तो सत्यतः स्वसंप्रदायाची अधिकाधिक हानी करतो. म्हणून एकत्र  असणे चांगले, एकमेकांचा धर्म (जीवन-तत्वे) ऐकणे व ऐकविणे (चांगले). देवानांप्रिय (राजा) इच्छा करतात की, सर्व संप्रदाय बहुश्रुत (विद्वान) होवोत, कल्याणगामी होवोत. त्या-त्या प्रसन्न (आपपल्या संप्रदायात प्रसन्न) जनांस सांगावे की, देवांनाप्रिय किर्ती व सारवृद्धीस (जसे) मानतात (तसे) दानास व पुजनास नव्हे. याच कारणास्तव अनेक धर्म-महामात्र, स्त्री-प्रधान-महामात्र, वज्रभुमिक आणि अन्य (अधिकारी) नियुक्त केले आहेत. याचाच परिणाम आहे की, स्वसंप्रदायाची वृद्धी आणि धम्माचे प्रकाशन होत आहे.
 
=== ब्रम्हगिरीब्रहमगिरी लघु शिलालेखाचा अनुवाद ===
आर्यपुत्राचे (सम्राटाचे) नावे, सुवर्णगिरीच्या महामात्रांनी आणि इसिलसिच्या महामात्रांस आरोग्य चिंतून असे सांगावे की, देवानंप्रियांनी आज्ञापिले आहे. अडीच वर्षांहून अधिक मी उपासक होतो पण विकास नव्हता. या वर्षांहून अतिरिक्त एक वर्षापासुन संघाच्या सानिध्यात अधिक विकास आहे. या काळात जंबुद्वीपा मधे श्रमण आणि मानवांत देव मिसळत नव्हते, आता मिसळत आहेत. हे पराक्रमाचे फळ आहे. हे केवळ महान लोकांनाच शक्य होते असे नव्हे तर विपुल पराक्रमाने सामान्य लोकांनाही स्वर्गात आरोहण शक्य आहे. यासाठीच हे सांगीतले आहे. सर्व लहान व थोरानी असा पराक्रम करावा. सीमेवरील लोकांनीही हे जाणून घ्यावे. असा पराक्रम चिरंतन व्हावा. यामुळे विकास वाढेल, विपुल वाढेल, अवरोधाविना दिवसेंदिवस वाढत राहील. २५६ काळ दूर रहातांना ही घोषणा केली आहे. देवानंप्रिय असे सांगतात. माता-पित्यांशी आज्ञाधारक असावे, तसेच गुरूजनांशीही (आज्ञाधारक असावे). प्राणिमात्रांशी दयाशील असावे, सत्य बोलावे. हे सद्धर्माचे गुण होत. असेच शिष्यांनी आचार्यांशी आचरावे. नातेवाईकांशी असेच आचरावे. पुर्वजांनीही असे सांगीतले आहे, यामुळे दीर्घायुष्य लाभते म्हणून असे वागावे.