"पुराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
अनावश्यक भाग काढून टाकला.
ओळ २:
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''पुराणे''' हे [[संस्कृत]] भाषेतील प्राचीन भारतीय ग्रंथ होत. पुराणे हे एकूण १८ असून ती [[व्यास पाराशर|मह‍र्षी व्यास मुनी]] यांनी लिहिली असे मत प्रचलित आहे. भक्तीबरोबरच [[ज्ञान]], [[कर्मकांड]], [[योग|योगविषयक]] तसेच भौतिक विषयांचे स्पष्टीकरण यांत आढळते. पुराणांचा लिहिण्याचा काळ [[वेद|वेदांच्या]] नंतरचा मानला जातो.
पुरा नवंं भवति इति पुराणम् । जे प्राचीन असूनही नित्यनूतन भासते ते पुराण अशी याची व्याख्या केली जाते,
 
==स्वरूप==
महाभारताप्रमाणे [[पुराणे]] ही [[देव]] व सिद्ध पुरुष यांच्या कथा होत. एकूण १८ पुराणे व १८ उपपुराणे आहेत. पुराणांमध्ये भौगोलिक वर्णनेही आहेत. तसेच भूकंपाविषयी माहिती मिळते.
पुराणांमध्ये राजधर्म,न्यायव्यवस्था,धर्मशास्र,देवतांंच्या स्तुतीपर कथा, आयुर्वेद,रत्नशास्र,विविध तीर्थक्षेत्रांंचे वर्णन इ.विषयांंचे वैपुल्य आढळते,
 
==लक्षणे==
Line ६५ ⟶ ६६:
 
 
=
== प. पू. प. प. श्रीवासुदेवानन्दसरस्वतीस्वामिमहाराजकृत श्रीदत्तपुराणाने स्थापित दत्त संप्रदायाचे वेदमूलकत्व ==
 
संपूर्ण भारतभर प्रसारित असणाऱ्या दत्त संप्रदायामध्ये प्रातःस्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामींचे नांव अत्यंत आदराने घेतले जाते. सनातन वैदिक धर्माचे मूळ म्हणजे वेद होय. वैदिक धर्मातून अनेक पंथ, सम्प्रदाय , उपासना प्रकार निर्माण झाले हे सर्वविदित आहे . हे सर्व पंथ, सम्प्रदाय आपली नाळ वेदांशी जोडलेली आहे असे सप्रमाण , सोदाहरण प्रतिपादित करतात. दत्त सम्प्रदायाच्या संबंधात हे कार्य प. प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती स्वामीमहाराजांनी केले आहे . कोणताही सम्प्रदाय हा सामान्यतः वेद स्मृती आगम पुराण सम्प्रदाय किंवा पंथ या क्रमाने युक्त असतो . दत्त सम्प्रदयाच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास प्रसिद्ध वेदांमध्ये दत्तसूक्त आढळत नाही. तसेच दत्त आगमही नाही. मग हा सम्प्रदाय वेदप्रणीत अथवा वेदमूलक कसा व्हावा ? तर दत्त सम्प्रदायाला वेदमूलकत्व देण्यासाठी स्वामींनी दत्तपुराणाची रचना केली . कारण –
वेदाः प्रतिष्ठिताः सर्वे पुराणे नात्र संशयः |
नारद पुराणामध्ये पुराणांचे महत्त्व सांगताना वरील पंक्ती आली आहे. पुराणांमध्ये वेद प्रतिष्ठित आहेत म्हणजेच वेदोक्त बाबींच्या आधारावरच पुराणांची रचना होते . त्यामुळे सर्व पुराणे ही वेदमूलकच असतात.
दुसरे असे की –
"https://mr.wikipedia.org/wiki/पुराणे" पासून हुडकले