"महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Pywikibot 3.0-dev
ओळ ७०:
एसटी ने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत. डिसेंबर २००२ मध्ये दादर- पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आरामसेवा एसटी चालवित आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात.
 
एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा देऊन एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल अॅपहीॲपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाउ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
बस प्रवासादरम्यान प्रवाश्यांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात.