"तरावाची लढाई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो Pywikibot 3.0-dev
ओळ १:
'''तरावाची लढाई''' [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धादरम्यान]] [[तरावा अॅटॉलॲटॉल]]च्या आसपास २०-[[२४ नोव्हेंबर]], [[इ.स. १९४३|१९४३]] दरम्यान लढली गेलेली लढाई होती. [[गॅल्व्हेनिक मोहीम|गॅल्व्हेनिक मोहीमेचा]] भाग असलेल्या या लढाईत सुमारे ६,६०० [[जपान|जपानी]], [[कोरिया|कोरियन]] आणि [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकन]] सैनिक मृत्यू पावले.
 
ऑगस्ट १९४२पासून सुमारे एक वर्ष सतत काम करुन [[शाही जपानी आरमार|जपानी आरमाराने]] या बेटांवर ठाणे तयार केले होते. व्यूहात्मकदृष्ट्या महत्वाचे असलेल्या या ठिकाणी दोस्त राष्ट्रांच्या आरमाराने हल्ला चढविल्यावर तेथील २,६३६ जपानी सैनिक आणि २,२०० (१,००० जपानी व १,२०० कोरियन) कामगारांनी कडाडून प्रतिकार केला. ५३,००० पेक्षा अधिक अमेरिकन सैन्याविरुद्ध लढताना जपानी शिबंदीने शेवटचा सैनिक मरेपर्यंत लढाई केली. लढाईच्या शेवटी त्यांच्यातील फक्त १७ सैनिक आणि १२९ कामगार दोस्त राष्ट्रांच्या हाती जिवंत लागले. दोस्त राष्ट्रांचे जमिनीवर सुमारे २,७०० सैनिक कामी आले तर [[यू.एस.एस. लिस्कोम बे]] या एस्कॉर्ट कॅरियरला मिळालेल्या जलसमाधीत ६८७ खलाशी आणि सैनिक मृत्यू पावले.