"बाळ ज. पंडित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ १:
'''बाळ जगन्नाथ पंडित''' ([[२४ जुलै]], [[इ.स. १९२९]] - [[१७ सप्टेंबर]], [[इ.स. २०१५]]) हे एक भारतीय क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट समालोचक होते.
 
वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासूनच त्यांना क्रिकेटची आवड निर्माण झाली होती. ते [[रणजी चषक]] सामन्यांत खेळले. त्यासाठी मामा, चुलत भाऊ, आणि वडील सरदार जगन्नाथ महाराज पंडित यांनी त्यांना खेळासाठी विशेष प्रोत्साहन दिले होते. रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकत असताना त्यांना रामभाऊ लेले यांसारखे क्रीडाप्रेमी शिक्षक लाभले. या शिक्षकाकडूनच त्यांना क्रिकेटच्या तंत्राबरोबरच जीवनाचे तंत्रही त्यांनी शिकविल्याची भावना पंडित नेहमीच व्यक्त करीत असत. लेले यांनी राजा केतकर, वसंत हसबनीस, मधु गुप्ते, माधव बर्वे अशा खेळाडूंनाही घडविलेले होते. रोहिंग्टन बारिया चषक स्पर्धेतून क्रिकेट खेळल्यानंतर बाळ ज. पंडितांनी सन १९५९-६० च्या रणजी मोसमात महाराष्ट्र संघात स्थान मिळविले. मात्र मैदानापेक्षा मैदानाबाहेरील त्यांची कारकीर्द विशेष गाजली.
 
त्यांनी विधी शाखेची पदवी घेऊन नोकरीस सुरुवात केली. लहानपणापासूनच मराठी व इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व आणि क्रिकेटविषयी असणारे प्रेम यांमुळे त्यांनी काही वर्तमानपत्रातून क्रिकेटविषयीचे लेखन सुरू केले. तत्कालीन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तुळपुळे यांनी पंडितांचे नाव आकाशवाणीत सुचविले होते. क्रिकेट समालोचन करताना त्यांनी आपल्या ओघवत्या मराठी भाषेत क्रिकेट घराघरांत पोचवले. मैदानावर २० आणि मैदानाबाहेर ५० वर्षे त्यांनी क्रिकेटची सेवा केली. त्यांनी शंभरहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांचे समालोचन केले. रणजी, दुलीप आणि इराणी करंडक स्पर्धेच्या असंख्य सामन्याचेही समालोचन करून त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. दीर्घ काळ (४२ वर्षे) समालोचन करण्याबद्दल 'लिम्का बुक ऑफ रेकार्ड'नेही याची दखल घेतली.
ओळ १५:
चेतन चौहान याच्यासह अनेक खेळाडूंना त्यांनी हे खेळाडू कोठे चुकतात, कोणती शैली वापरल्यास चौकार किंवा षटकार जाईल. गोलंदाजी करताना बळी मिळविण्यासाठी चेंडू कसा टाकला पाहिजे आदींबाबतही मार्गदर्शन केले होते. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष, सहसचिव आदी अनेक जबाबदार्‍या त्यांनी समर्थपणे हाताळल्या. या संघटनेला नावारूपास आणण्यात आणि पुणे शहरास आंतरराष्ट्रीय सामन्यांचे संयोजन शहर म्हणून नावलौकिक मिळवून देण्यात त्यांचा वाटा मोठा आहे.
 
बाळ पंडित एमए, एल्‌एलबी होते. एल्‌एलबीच्या परीक्षेत ते पुणे विद्यापीठात तिसरे आले होते. क्रिकेट समालोचनाच्या कामाशिवाय बाळ ज. पंडित यांनी शैक्षणिक आणि धार्मिक संस्थावरही काम केले आहे. आळंदी देवस्थानचे देखील ते काही काळ (१९६६ ते १९९९) विश्‍वस्त होते. शिक्षण प्रसारक मंडळीं, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व मॉडर्न एज्युकेशन सोसायटी सारख्या नामवंत शिक्षण संस्थांचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.
 
==बाळ ज. पंडित यांनी लिहिलेली पुस्तके (एकूण ३० हून अधिक)==