"मेघदूत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६:
मेघदूताचा नायक (यक्ष) हा अलका नगरीत राहणारा यक्षेश्वराचा एक सेवक होता. नेमून दिलेल्या कामात अापल्या पत्‍नीच्या नादाने हलगर्जीपणा केल्याने त्या यक्षाला, यक्षराजाने (कुबेराने) एका वर्षासाठी हद्दपारीची शिक्षा फर्माविली. हद्दपारीचे ठिकाण अलका नगरीहून फार दूर अंतरावर असलेला 'रामगिरि' पर्वत हे होते. त्या ठिकाणी बरेच महिने पत्‍नीपासून दूर राहिला असताना, कामीजनांना अत्यंत पीडा देणारा वर्षाऋतू सुरू झाला. तेव्हा त्या यक्षाच्या मनोवृत्ती एकदम उचंबळून अाल्या. त्या निर्जन प्रदेशात यक्षाला चेतन व अचेतन याचेही भान राहिले नाही. त्यामुळे त्या यक्षाने मेघालाच दूत कल्पून अापल्या पत्‍नीला निरोप सांगण्याचे काम सोपविले.
 
प्रथम रामगिरीपासून अलका नगरीपर्यंत जाणार्‍या मार्गाचे रसभरित वर्णन करून करुणरसपरिप्लुत असा संदेश प्रियेस सांगून प्रियेचे शुभवर्तमान मला परत येऊन देण्याचे सांगून यक्षाने मेघाची अलका नगरीकडे रवानगी केली. येथेच या काव्याची परिसमाप्ती करण्यात अाली अाहे.हे काव्य अतिशय मनोहारीरमणीय आहे <ref>संपादक: प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांचे संपादकीय निवेदन (महाकवि श्रीकालिदासविरचित 'मेघदूत' (१९३५) भाषान्तरकार :रामचंद्र गणेश पाटील) </ref>
 
==कालिदास जयंती==
"https://mr.wikipedia.org/wiki/मेघदूत" पासून हुडकले